S M L

सुबोध मराठी भाषांतरात सुबोध बायबल

रोहिणी गोसावी,वसई25 डिसेंबरबायबल या धर्मग्रंथाचे आतापर्यंत अनेकदा मराठीत भाषांतर करण्यात आलं. पण फादर दिब्रिटो यांनी बायबलचं सुबोध मराठीत भाषांतर केलं आहेत. त्याला नावही सुबोध बायबल असंच दिलं आहे. बायबलचे मराठी भाषांतर समजायला कठीण जातात. त्यामुळे सुबोध मराठीतून बायबल लिहिण्याची कल्पना फादर दिब्रिटो यांना सुचली.अडीच हजार वर्षांपुर्वीचे बायबल हा जगाला देणगी मिळालेल्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे. यातले मौलिक विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत म्हणून बायबलचा व्यासंग असणार्‍या फादर दिब्रिटो यांनी बायबलचे भाषांतर केलं. 12 वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सुबोध बायबल लोकांपर्यंत पोहोचवलं. सुबोध बायबल हे काही मराठीतले पहिले बायबल नाही. गेल्या दोनशे वर्षात बायबलचे अनेकदा मराठीत भाषांतर करण्यात आलं. पण ते भाषांतर हिब्रु आणि ज्यू भाषेवरुन शब्दश: करण्यात आल्यामुळे त्यातील बरेचशे शब्द बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते मराठीत वाचताना त्याचा अर्थ लावणं अनेकदा कठीण जातं. शब्दांपेक्षा चित्राची भाषा लवकर समजते त्यामुळे या सुबोध बायबलमध्ये सोप्या भाषेबरोबर चित्रांचाही वापर केला. येशुच्या जिवनातील अनेक प्रसंग चित्ररुपाने या बायबलमध्ये दाखवण्यात आले. त्यामुळे सुबोध बायबल हे समजण्यासाठी अतिशय सोप्पं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 06:51 AM IST

सुबोध मराठी भाषांतरात सुबोध बायबल

रोहिणी गोसावी,वसई

25 डिसेंबर

बायबल या धर्मग्रंथाचे आतापर्यंत अनेकदा मराठीत भाषांतर करण्यात आलं. पण फादर दिब्रिटो यांनी बायबलचं सुबोध मराठीत भाषांतर केलं आहेत. त्याला नावही सुबोध बायबल असंच दिलं आहे. बायबलचे मराठी भाषांतर समजायला कठीण जातात. त्यामुळे सुबोध मराठीतून बायबल लिहिण्याची कल्पना फादर दिब्रिटो यांना सुचली.अडीच हजार वर्षांपुर्वीचे बायबल हा जगाला देणगी मिळालेल्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ आहे. यातले मौलिक विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचावेत म्हणून बायबलचा व्यासंग असणार्‍या फादर दिब्रिटो यांनी बायबलचे भाषांतर केलं. 12 वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सुबोध बायबल लोकांपर्यंत पोहोचवलं. सुबोध बायबल हे काही मराठीतले पहिले बायबल नाही. गेल्या दोनशे वर्षात बायबलचे अनेकदा मराठीत भाषांतर करण्यात आलं. पण ते भाषांतर हिब्रु आणि ज्यू भाषेवरुन शब्दश: करण्यात आल्यामुळे त्यातील बरेचशे शब्द बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते मराठीत वाचताना त्याचा अर्थ लावणं अनेकदा कठीण जातं.

शब्दांपेक्षा चित्राची भाषा लवकर समजते त्यामुळे या सुबोध बायबलमध्ये सोप्या भाषेबरोबर चित्रांचाही वापर केला. येशुच्या जिवनातील अनेक प्रसंग चित्ररुपाने या बायबलमध्ये दाखवण्यात आले. त्यामुळे सुबोध बायबल हे समजण्यासाठी अतिशय सोप्पं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 06:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close