S M L

गोडसेचा गौरव चुकीचा - उत्तम कांबळे

25 डिसेंबरसाहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने साहित्य क्षेत्रात एकचं खळबळ उडाली. या सर्व प्रकाराबद्दल उत्तम कांबळे यांनी जाहीर निषेध केला आहे. आज पर्यंतच्या वाटचालीत अशा व्यक्ती आणि प्रवृतीचा निषेधच करत आलो आहे. आणि हे संतापजनकच आहे अशा शब्दात उत्तम कांबळे यांनी आपला निषेध व्यक्त केला. ही स्मरणिका परत घेण्यात आली आहे.पुन्हा नव्याने स्मरणिका तयार करण्यात येणार आहे. समर्थन आणि माफीनथुराम गोडसेचं समर्थन करणार्‍या आयोजक नरेंद्र पाठक यांनी माफी मागून स्मरणिका परत घेण्याची घोषणा केली. आयबीएन-लोकमतने ही बाब उघडकीला आणल्यानंतर साहित्यवर्तुळात खळबळ माजली. आणि स्मरणिका मागे घेण्यासाठी सर्वस्तरीय दबाव वाढला. त्यानंतर आयोजकांनी माघार घेतली आहे. नथुराम गोडसे यांचं स्मरणिकेत नाव घालायला आयोजक नरेंद्र पाठक यांनी समर्थन केले होते.अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आले आहे. याचा खुलासा होताच अनेक मान्यवरांनी याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. सर्व स्मरणिका मागे घेण्यात आल्या आहे. स्मरणिका परत नव्याने छापण्यात येणार आहे असे संमेलन आयोजक नरेंद्र पाठक यांनी सांगितले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्मरणिका जाळून निषेध व्यक्त केला. ही स्मरणिका तातडीनं मागे घेण्यात यावी अशी मागणीही आव्हाडांनी केली.वादग्रस्त स्मरणिकेत छापण्यात आलेली वाक्य... महात्मा गाधींजी बद्दल नितांत आदर होता. त्यांनी "द मॅन द महात्मा" हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले होते. विनायक दामोदर सावकर यांचे निस्सीम भक्त. प्रखर हिंदुत्ववादी. "अग्रणी" या वृत्तपत्राचे संपादक.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 11:43 AM IST

गोडसेचा गौरव चुकीचा - उत्तम कांबळे

25 डिसेंबर

साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने साहित्य क्षेत्रात एकचं खळबळ उडाली. या सर्व प्रकाराबद्दल उत्तम कांबळे यांनी जाहीर निषेध केला आहे. आज पर्यंतच्या वाटचालीत अशा व्यक्ती आणि प्रवृतीचा निषेधच करत आलो आहे. आणि हे संतापजनकच आहे अशा शब्दात उत्तम कांबळे यांनी आपला निषेध व्यक्त केला. ही स्मरणिका परत घेण्यात आली आहे.पुन्हा नव्याने स्मरणिका तयार करण्यात येणार आहे.

समर्थन आणि माफी

नथुराम गोडसेचं समर्थन करणार्‍या आयोजक नरेंद्र पाठक यांनी माफी मागून स्मरणिका परत घेण्याची घोषणा केली. आयबीएन-लोकमतने ही बाब उघडकीला आणल्यानंतर साहित्यवर्तुळात खळबळ माजली. आणि स्मरणिका मागे घेण्यासाठी सर्वस्तरीय दबाव वाढला. त्यानंतर आयोजकांनी माघार घेतली आहे. नथुराम गोडसे यांचं स्मरणिकेत नाव घालायला आयोजक नरेंद्र पाठक यांनी समर्थन केले होते.अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेंचे स्मरण करण्यात आले आहे. याचा खुलासा होताच अनेक मान्यवरांनी याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. सर्व स्मरणिका मागे घेण्यात आल्या आहे. स्मरणिका परत नव्याने छापण्यात येणार आहे असे संमेलन आयोजक नरेंद्र पाठक यांनी सांगितले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्मरणिका जाळून निषेध व्यक्त केला. ही स्मरणिका तातडीनं मागे घेण्यात यावी अशी मागणीही आव्हाडांनी केली.

वादग्रस्त स्मरणिकेत छापण्यात आलेली वाक्य...

महात्मा गाधींजी बद्दल नितांत आदर होता. त्यांनी "द मॅन द महात्मा" हे पुस्तक त्यांच्यावर लिहिले होते. विनायक दामोदर सावकर यांचे निस्सीम भक्त. प्रखर हिंदुत्ववादी. "अग्रणी" या वृत्तपत्राचे संपादक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close