S M L

सोनिया गांधी यांना अशोक सिंघल यांची धमकी

25 डिसेंबरविश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या एका वक्तव्याचे पडसाद दिवसभर उमटले. सोनिया गांधी जास्त हुशारी करू नका. नाही तर इंदिरा गांधीचंी जी अवस्था झाली ती तुमची करू अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी आज औरंगाबाद येथे दिली. हनुमंत शक्ती जनजागरण समितीच्या हिंदू संंमेलनाता अशोक सिंघल यांनी जाहीर भाषणातून ही धमकी दिली. आणि धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. रामजन्मभुमी न्यासाच्या जागेप्रकरणी संसेदत कायदा करण्यात यावा या मागणीचा ठरावही या जाहीर सभेत मंजूर करण्यात आला. औरंगाबाद येथे रामजन्मभुमी न्यासाच्या जनजागरणासाठी अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत हिंदू जनजागरण जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होते. औरंगाबाद शहरातील हडको भागात टी व्ही सेंटर मैदानावर झालेल्या या जाहीर सभेत रामजन्मभूमीसोबतच तीन ठराव मंजूर करण्यात आले. या सभेत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनी सोनिया गांधी यांना थेट धमकी दिली.अशोक सिंघल यांच्या विधानावर नाशिकच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विहीपचे अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या प्रतिमेचं दहन केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल औरंगाबादमध्ये सिंघल यांनी व्यक्त केलेल्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 12:02 PM IST

सोनिया गांधी यांना अशोक सिंघल यांची धमकी

25 डिसेंबर

विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या एका वक्तव्याचे पडसाद दिवसभर उमटले. सोनिया गांधी जास्त हुशारी करू नका. नाही तर इंदिरा गांधीचंी जी अवस्था झाली ती तुमची करू अशी धमकी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी आज औरंगाबाद येथे दिली. हनुमंत शक्ती जनजागरण समितीच्या हिंदू संंमेलनाता अशोक सिंघल यांनी जाहीर भाषणातून ही धमकी दिली. आणि धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. रामजन्मभुमी न्यासाच्या जागेप्रकरणी संसेदत कायदा करण्यात यावा या मागणीचा ठरावही या जाहीर सभेत मंजूर करण्यात आला. औरंगाबाद येथे रामजन्मभुमी न्यासाच्या जनजागरणासाठी अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत हिंदू जनजागरण जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होते. औरंगाबाद शहरातील हडको भागात टी व्ही सेंटर मैदानावर झालेल्या या जाहीर सभेत रामजन्मभूमीसोबतच तीन ठराव मंजूर करण्यात आले. या सभेत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनी सोनिया गांधी यांना थेट धमकी दिली.

अशोक सिंघल यांच्या विधानावर नाशिकच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विहीपचे अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या प्रतिमेचं दहन केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल औरंगाबादमध्ये सिंघल यांनी व्यक्त केलेल्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close