S M L

दादोजींचा पुतळा हटवण्यावरुन शिवसेनेचे औरंगाबादमध्ये निदर्शन

27 डिसेंबरपुण्यातील लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे शिवसेनेनं जोरदार निदर्शन केली. औरंगाबाद महापालिकेच्या छत्रपती पुराणवस्तुसंग्रहालयात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उभारण्याची घोषणाही यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. राज्यभरात महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना त्याला बगल देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने हे षंडयंत्र रचल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. औरंगाबादच्या क्रांतीचौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही निदर्शन केली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला तर खासदार खैरे यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महानगरपालिकेला उभारणार असल्याचे सांगितले. महापौर अनिता घोडेले यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 04:11 PM IST

दादोजींचा पुतळा हटवण्यावरुन शिवसेनेचे औरंगाबादमध्ये निदर्शन

27 डिसेंबर

पुण्यातील लालमहालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे शिवसेनेनं जोरदार निदर्शन केली. औरंगाबाद महापालिकेच्या छत्रपती पुराणवस्तुसंग्रहालयात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा उभारण्याची घोषणाही यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. राज्यभरात महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना त्याला बगल देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने हे षंडयंत्र रचल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. औरंगाबादच्या क्रांतीचौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही निदर्शन केली.

यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला तर खासदार खैरे यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महानगरपालिकेला उभारणार असल्याचे सांगितले. महापौर अनिता घोडेले यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close