S M L

विठुरायाच्या दर्शनासाठी रत्नागिरीच्या वारकर्‍यांची पायी दिंडी

1 नोव्हेंबर, रत्नागिरीकार्तिकी एकादशीसाठी म्हणजेच कार्तिकी वारीसाठी रत्नागिरीतल्या लांजामधून पंढरपूरकडे पायी दिंडी निघाली आहे. या दिंडीचं हे विसावं वर्ष आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी कार्तिकी एकादशीनिमीत्त कोकणातून दरवर्षी पायी दिंड्या निघतात. या वर्षीही लांजा तालुक्यातून वारकर्‍यांची दिंडी निघाली आहे. 1988 मध्ये लांज्यातल्या वासकर महाराजांच्या मठातून सात वारकर्‍यांनी ही दिंडी सुरू केली होती. 9 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. त्याआधी 7 नोव्हेंबरला ही दिंडी पंढरपुरात पोहोचेल. ' दरवर्षी पाच तरी नवीन वारकरी या दिंडीत सहभागी होतात. आणि व्यसनमुक्त होतात. आणि त्यांचं कुटुंब सुखी होतं’,असं वारकरी जनार्दन शिंगरे सांगत होते.यंदा 150 वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. त्यात महिला वारकर्‍यांनीही उत्साहात भाग घेतलाय. ' मी तीन वर्ष येतेय. कितीही थकवा असला तरी मला त्याचं काहीही वाटत नाही. या दिंडीतली माणसं फार प्रेमळ आणि त्यामुळे मला हे जमलं ', असं वारकरी जानकीबाई चव्हाण उत्साहानं सांगत होत्या. आषाढी वारीएवढं महत्त्व कार्तिकी वारीला मिळत नाही. पण त्यामुळे वारकर्‍यांच्या विठ्ठलभक्तीमध्ये कुठेही उणेपणा येत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत ते पंढरीकडे चालत राहतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 04:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close