S M L

पुतळा पुन्हा बसवणार उद्धव ठाकरेंचं आव्हान

27 डिसेंबरगेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू असलेला लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेनं अखेर हटवला आहे. रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. दादोजींचा हा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न करु असं सांगून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता पुणे महानगरपालिकेला आव्हान दिलं आहे. अनेक अनधिकृत बांधकामांना पुणे महानगरपालिका पाठीशी घालते. लवासावर अजून हातोडा का पडला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. दादोजींचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज भाजप-शिवसेनेने मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चामध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुतळा हटवल्याचा निषेध केला. दरम्यान, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याचा निषेध करत शिवसेनेने उद्या म्हणजेच मंगळवारी पुणे शहर आणि जिल्हा बंदही हाक दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहर आणि जिल्हा बंदचे आवाहन केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 09:48 AM IST

पुतळा पुन्हा बसवणार उद्धव ठाकरेंचं आव्हान

27 डिसेंबर

गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू असलेला लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महापालिकेनं अखेर हटवला आहे. रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला हा पुतळा हलवण्यात आला. यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. दादोजींचा हा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न करु असं सांगून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता पुणे महानगरपालिकेला आव्हान दिलं आहे. अनेक अनधिकृत बांधकामांना पुणे महानगरपालिका पाठीशी घालते. लवासावर अजून हातोडा का पडला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. दादोजींचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज भाजप-शिवसेनेने मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चामध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुतळा हटवल्याचा निषेध केला. दरम्यान, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याचा निषेध करत शिवसेनेने उद्या म्हणजेच मंगळवारी पुणे शहर आणि जिल्हा बंदही हाक दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहर आणि जिल्हा बंदचे आवाहन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close