S M L

मत्स्यगंधा महोत्सवात खवय्यांची उसळली झुंबड

28 डिसेंबरमुश्ताक खान, मुंबई खवय्यांना खुष करणारा मत्स्यगंधा महोत्सव मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरु आहेत. मत्स्य विभाग आणि कृषी मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात कोळी समाजाच्या आणि मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद लुटता येतो. मत्स्यगंधा महोत्सवात चवदार पदार्थांचा फक्कड बेत जमला आहे. त्यामुळे मासेप्रेमींची पावलं महोत्सवाकडे वळतायत. पापलेट, सुरमई, कोळंबी, खेकडे अशा विविध जातींच्या माशांच्या पदार्थांचा त्यात समावेश आहे. पापलेट तंदुरी या महोत्सवाची खासीयत आहे. कोळी समाजाची खाद्य संस्कृती या महोत्सवात पहायला मिळते. गेल्या दोन दिवसांपासून महोत्सवात खवय्यांनी माशांचा विविध प्रकारावर ताव मारला. अस्सल मालवणी पदार्थ्यांचीही इथं रेलचेल बघायला मिळाली. तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ आणि सोबत चवदार भाकरीचा आणि वड्याचा आस्वाद इथं घेतला जातोय.मत्स्यगंधा महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. एरव्ही बाजारात न भेटणारे पदार्थही इथं खवय्यांना चाखायला मिळत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2010 10:47 AM IST

मत्स्यगंधा महोत्सवात खवय्यांची उसळली झुंबड

28 डिसेंबर

मुश्ताक खान, मुंबई खवय्यांना खुष करणारा मत्स्यगंधा महोत्सव मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरु आहेत. मत्स्य विभाग आणि कृषी मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात कोळी समाजाच्या आणि मालवणी खाद्य संस्कृतीचा आनंद लुटता येतो. मत्स्यगंधा महोत्सवात चवदार पदार्थांचा फक्कड बेत जमला आहे. त्यामुळे मासेप्रेमींची पावलं महोत्सवाकडे वळतायत. पापलेट, सुरमई, कोळंबी, खेकडे अशा विविध जातींच्या माशांच्या पदार्थांचा त्यात समावेश आहे. पापलेट तंदुरी या महोत्सवाची खासीयत आहे. कोळी समाजाची खाद्य संस्कृती या महोत्सवात पहायला मिळते.

गेल्या दोन दिवसांपासून महोत्सवात खवय्यांनी माशांचा विविध प्रकारावर ताव मारला. अस्सल मालवणी पदार्थ्यांचीही इथं रेलचेल बघायला मिळाली. तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ आणि सोबत चवदार भाकरीचा आणि वड्याचा आस्वाद इथं घेतला जातोय.मत्स्यगंधा महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. एरव्ही बाजारात न भेटणारे पदार्थही इथं खवय्यांना चाखायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close