S M L

कॉमनवेल्थचा 'किचन' घोटाळा ; 20 कोटींचा भुर्दंड

28 डिसेंबरकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी अगोदरच अडचणीत आले आहेत. त्यातच कलमाडी यांना आणखी अडचणीत आणणारी एक घटना उघडकीला आली. कलमाडी यांनी कॉमनवेल्थच्या केटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी खूप उशीर केला. आणि त्यामुळे सरकारला 20 कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. आयबीएन-नेटवर्कच्या हाती याबाबतची कागदपत्र लागली आहेत. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील चकचकीत किचन. गेम्सच्यावेळी हजारो ऍथलेट्स आणि अधिकारी जिथे दररोज जेवत होते ते हे ठिकाण. सुरुवातीला या किचनचे खूप कौतुक झाले. भलमोठ किचन, मोठमोठे रेफ्रिजरेटर आणि आता अगोदरच अडचणीत आलेल्या कलमाडी यांच्यासाठी चिंतेचे आणखी एक मोठ कारण. आयबीएन-नेटवर्कच्या हाती काही गोपनीय कागदपत्र लागली आहेत. त्यात केटरिंगचे कॉन्ट्रक्ट देण्यासाठी कलमाडी यांनी पहिल्यांदा फाईली कशा हाताळल्या ते स्पष्ट होतं. त्यांनी डेल्वेअर नॉर्थ या कंपनीचे कॉन्ट्रक्ट रद्द सुद्धा केलं. नंतर याच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. निर्णयातल्या या गोंधळामुळे 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा झाला. आयोजन समितीच्या सदस्यानी लिहिलेली ही अंतर्गत नोट आता ती तपास अधिकार्‍यांकडे आहे.आगाऊ रक्कम भरलेली नसतानाही डेल्वेअर नॉर्थने लावलेल्या बोलीची कागदपत्र समितीने फोडली. 11 डिसेंबर 2009 रोजी कॉन्ट्रॅक्टची फाईल आयोजन समितीचे महासंचालक आणि सीईओ यांच्याकडून अध्यक्षांपर्यंत फिरली. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पण 6 जानेवारी 2010 ला एक नोट काढण्यात आली. त्यात निर्णयाला होत असलेल्या उशिराचे परिणाम काय होतील हे सांगण्यात आले. 12 जानेवारी 2010 रोजी अध्यक्ष कलमाडी यांनी पुन्हा टेंडर काढण्याचा निर्णय दिला. कारण 30 लाखांची आगाऊ रक्कम डेल्वेअर नॉर्थने भरलेली नव्हती. कलमाडींनी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नोट काढण्यात आली. त्यात म्हटलं की, डेल्वेअर नॉर्थची बोली रद्द करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे याचे टेंडर पुन्हा काढायला हवेत. 11 डिसेंबर 2009 ते 12 जानेवारी 2010 इतका काळ कलमाडींनी निर्णय घेण्यात का घालवला हा प्रश्न आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलमाडींचे सहकारी डेल्वेअर कंपनीशी स्पॉन्सरशीप डीलबाबत वाटाघाटी करत होते. पण कंपनीची मात्र वाटाघाटी करण्याची इच्छा नव्हती.डेल्वेअरशी संपर्क केलेली व्यक्ती कोण याचा तपास अधिकारी करत आहेत. स्पॉन्सरशिप डील मिळवण्यासाठी हे सर्व चाललं होतं की त्यामागे आणखी कोणता हेतू होता याचा शोध घेतला जात आहे.- कॉमनवेल्थच्या किचनसाठी लागणारे सामान भाड्याने घेण्याची योजना होती. पण उशीर झाल्याने ते विकत घ्यावे लागले. - त्यानंतर ते रशियान विमानातून आणण्यात आले. कारण जहाजातून आणण्यासाठी वेळ कमी होता - हा सर्व खर्च 93 कोटी रुपये झाला. त्यासाठी 73 कोटी खर्च अपेक्षित होता. संपूर्ण केटरिंगची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍याने कलमाडींना त्यांच्या निर्णयानंतर दुसर्‍या दिवशी एक पत्र पाठवलं. शेवटच्या क्षणी पुन्हा टेंडर काढण्याच्या निर्णयामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं त्यांनी पत्रात म्हटलं. कलमाडींनी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात हे मान्य केले. पण स्पर्धाना अवघे काहीच महिने राहिलेले असल्याने ऐनवेळच्या या निर्णयाचा मोठा भुर्दंड बसला.कॉमनवेल्थचा 'किचन' घोटाळा - आगाऊ रक्कम नसतानाही डेल्वेअर नॉर्थच्या बोलीची कागदपत्रं फोडली- 11 डिसेंबर 2009 रोजी कॉन्ट्रॅक्टची फाईल कलमाडींपर्यंत पोचली - 6 जानेवारी 2010 ला आयोजन समितीची नोट प्रसिद्ध - 12 जानेवारी 2010 रोजी कलमाडींनी पुन्हा टेंडर काढण्याचा निर्णय घेतला- 30 लाखांची आगाऊ रक्कम डेल्वेअर नॉर्थने भरलेली नव्हती

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2010 05:45 PM IST

कॉमनवेल्थचा 'किचन' घोटाळा ; 20 कोटींचा भुर्दंड

28 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी अगोदरच अडचणीत आले आहेत. त्यातच कलमाडी यांना आणखी अडचणीत आणणारी एक घटना उघडकीला आली. कलमाडी यांनी कॉमनवेल्थच्या केटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी खूप उशीर केला. आणि त्यामुळे सरकारला 20 कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. आयबीएन-नेटवर्कच्या हाती याबाबतची कागदपत्र लागली आहेत.

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील चकचकीत किचन. गेम्सच्यावेळी हजारो ऍथलेट्स आणि अधिकारी जिथे दररोज जेवत होते ते हे ठिकाण. सुरुवातीला या किचनचे खूप कौतुक झाले. भलमोठ किचन, मोठमोठे रेफ्रिजरेटर आणि आता अगोदरच अडचणीत आलेल्या कलमाडी यांच्यासाठी चिंतेचे आणखी एक मोठ कारण. आयबीएन-नेटवर्कच्या हाती काही गोपनीय कागदपत्र लागली आहेत. त्यात केटरिंगचे कॉन्ट्रक्ट देण्यासाठी कलमाडी यांनी पहिल्यांदा फाईली कशा हाताळल्या ते स्पष्ट होतं. त्यांनी डेल्वेअर नॉर्थ या कंपनीचे कॉन्ट्रक्ट रद्द सुद्धा केलं. नंतर याच कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. निर्णयातल्या या गोंधळामुळे 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा तोटा झाला. आयोजन समितीच्या सदस्यानी लिहिलेली ही अंतर्गत नोट आता ती तपास अधिकार्‍यांकडे आहे.

आगाऊ रक्कम भरलेली नसतानाही डेल्वेअर नॉर्थने लावलेल्या बोलीची कागदपत्र समितीने फोडली. 11 डिसेंबर 2009 रोजी कॉन्ट्रॅक्टची फाईल आयोजन समितीचे महासंचालक आणि सीईओ यांच्याकडून अध्यक्षांपर्यंत फिरली. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पण 6 जानेवारी 2010 ला एक नोट काढण्यात आली. त्यात निर्णयाला होत असलेल्या उशिराचे परिणाम काय होतील हे सांगण्यात आले. 12 जानेवारी 2010 रोजी अध्यक्ष कलमाडी यांनी पुन्हा टेंडर काढण्याचा निर्णय दिला. कारण 30 लाखांची आगाऊ रक्कम डेल्वेअर नॉर्थने भरलेली नव्हती.

कलमाडींनी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर ही नोट काढण्यात आली. त्यात म्हटलं की, डेल्वेअर नॉर्थची बोली रद्द करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. त्यामुळे याचे टेंडर पुन्हा काढायला हवेत. 11 डिसेंबर 2009 ते 12 जानेवारी 2010 इतका काळ कलमाडींनी निर्णय घेण्यात का घालवला हा प्रश्न आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलमाडींचे सहकारी डेल्वेअर कंपनीशी स्पॉन्सरशीप डीलबाबत वाटाघाटी करत होते. पण कंपनीची मात्र वाटाघाटी करण्याची इच्छा नव्हती.

डेल्वेअरशी संपर्क केलेली व्यक्ती कोण याचा तपास अधिकारी करत आहेत. स्पॉन्सरशिप डील मिळवण्यासाठी हे सर्व चाललं होतं की त्यामागे आणखी कोणता हेतू होता याचा शोध घेतला जात आहे.

- कॉमनवेल्थच्या किचनसाठी लागणारे सामान भाड्याने घेण्याची योजना होती. पण उशीर झाल्याने ते विकत घ्यावे लागले. - त्यानंतर ते रशियान विमानातून आणण्यात आले. कारण जहाजातून आणण्यासाठी वेळ कमी होता - हा सर्व खर्च 93 कोटी रुपये झाला. त्यासाठी 73 कोटी खर्च अपेक्षित होता.

संपूर्ण केटरिंगची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍याने कलमाडींना त्यांच्या निर्णयानंतर दुसर्‍या दिवशी एक पत्र पाठवलं. शेवटच्या क्षणी पुन्हा टेंडर काढण्याच्या निर्णयामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं त्यांनी पत्रात म्हटलं. कलमाडींनी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात हे मान्य केले. पण स्पर्धाना अवघे काहीच महिने राहिलेले असल्याने ऐनवेळच्या या निर्णयाचा मोठा भुर्दंड बसला.कॉमनवेल्थचा 'किचन' घोटाळा

- आगाऊ रक्कम नसतानाही डेल्वेअर नॉर्थच्या बोलीची कागदपत्रं फोडली- 11 डिसेंबर 2009 रोजी कॉन्ट्रॅक्टची फाईल कलमाडींपर्यंत पोचली - 6 जानेवारी 2010 ला आयोजन समितीची नोट प्रसिद्ध - 12 जानेवारी 2010 रोजी कलमाडींनी पुन्हा टेंडर काढण्याचा निर्णय घेतला- 30 लाखांची आगाऊ रक्कम डेल्वेअर नॉर्थने भरलेली नव्हती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2010 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close