S M L

दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 87 रन्सनी विजय

29 डिसेंबरडरबन टेस्टमध्ये भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टेस्ट क्रिकेटमधल नंबर वनच स्थान कायम राखलं आहे. या विजयाबरोबरच भारताने तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरीही केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 87 रन्सन पराभव केला. भारताने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 303 रन्सचे टार्गेट ठेवलं होतं. पण भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीसमोर आफ्रिकेला हे आव्हान पेलवता आलं नाही. आणि त्यांची संपुर्ण टीम 215 रन्समध्येच ऑलआऊट झाली. तिसर्‍या दिवस अखेर 4 बाद 111 रन्सवर खेळणार्‍या दक्षिण आफ्रिकेला आज चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच धक्का बसला. एस श्रीसंतने एका अप्रतिम बाऊन्सरवर जॅक कॅलिसला आऊट केले. आणि इथंच भारताचा विजयही निश्चित झाला. यानंतर हरभजनने एबी डिव्हिलिअर्सचा तर झहीर खानने मार्क बाऊचरचा अडसर झटपट दुर केला.तर लक्ष्मण हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. दुसर्‍या इनिंगमध्ये त्यानं 96 रन्सची शानदार खेळी करत भारताला विजयाची संधी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 12:16 PM IST

दक्षिण आफ्रिकेवर भारताचा 87 रन्सनी विजय

29 डिसेंबर

डरबन टेस्टमध्ये भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टेस्ट क्रिकेटमधल नंबर वनच स्थान कायम राखलं आहे. या विजयाबरोबरच भारताने तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरीही केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 87 रन्सन पराभव केला. भारताने विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 303 रन्सचे टार्गेट ठेवलं होतं. पण भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीसमोर आफ्रिकेला हे आव्हान पेलवता आलं नाही. आणि त्यांची संपुर्ण टीम 215 रन्समध्येच ऑलआऊट झाली. तिसर्‍या दिवस अखेर 4 बाद 111 रन्सवर खेळणार्‍या दक्षिण आफ्रिकेला आज चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच धक्का बसला. एस श्रीसंतने एका अप्रतिम बाऊन्सरवर जॅक कॅलिसला आऊट केले. आणि इथंच भारताचा विजयही निश्चित झाला. यानंतर हरभजनने एबी डिव्हिलिअर्सचा तर झहीर खानने मार्क बाऊचरचा अडसर झटपट दुर केला.तर लक्ष्मण हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. दुसर्‍या इनिंगमध्ये त्यानं 96 रन्सची शानदार खेळी करत भारताला विजयाची संधी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close