S M L

तोडफोडीचे दिले होते आदेश ; शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप !

29 डिसेंबरपुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळला. मात्र या दिवशी काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास 53 बसेस फोडण्यात आल्या होत्या. बंदच्या संदर्भात पुणे पोलिसांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे आणि उद्धव ठाकरेंचे स्विय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्पेशल ब्रैंचने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पुण्याच्या बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल भडकवणे, तोडफोड करणे यासाठी कलम 153, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात झालेलं संभाषण रेक्‌ॉर्ड करुन त्याच्या आधारावर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळती मिळाली आहे.बंदच्या एक दिवस अगोदर म्हणजे सोमवार 27 डिसेंबर रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी हे संभाषण रेकॉर्ड झाले. यामध्ये मंगळवारी 200 ते 300 लोकांना रस्त्यावर उतरवा आणि महत्त्वाच्या ठिकाणाच्या किमान पाच एसटी बस पेटवा. हे सगळं अचानक झालं पाहिजे आणि तिथं टीव्ही क्रू येतील याची व्यवस्था करा. एक्स्प्रेस वे वर दोन बस आणि दोन ट्रक पेटवून द्या असं या संभाषणात म्हटल्याचे एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहे. कोणते गुन्हे दाखल?- कलम 153, 120 (ब) आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल - कलम 153 - दोन समाजात तेढ निर्माण करून लोकांना भडकावणं- कलम 120 (ब) - तोडफोडीच्या कटाचा आरोप - कलम 34 - तोडफोडीमध्ये सहभागी होण्याचा आरोप

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 02:12 PM IST

तोडफोडीचे दिले होते आदेश ; शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप !

29 डिसेंबरपुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळला. मात्र या दिवशी काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास 53 बसेस फोडण्यात आल्या होत्या. बंदच्या संदर्भात पुणे पोलिसांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे आणि उद्धव ठाकरेंचे स्विय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्पेशल ब्रैंचने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पुण्याच्या बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल भडकवणे, तोडफोड करणे यासाठी कलम 153, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात झालेलं संभाषण रेक्‌ॉर्ड करुन त्याच्या आधारावर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळती मिळाली आहे.

बंदच्या एक दिवस अगोदर म्हणजे सोमवार 27 डिसेंबर रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी हे संभाषण रेकॉर्ड झाले. यामध्ये मंगळवारी 200 ते 300 लोकांना रस्त्यावर उतरवा आणि महत्त्वाच्या ठिकाणाच्या किमान पाच एसटी बस पेटवा. हे सगळं अचानक झालं पाहिजे आणि तिथं टीव्ही क्रू येतील याची व्यवस्था करा. एक्स्प्रेस वे वर दोन बस आणि दोन ट्रक पेटवून द्या असं या संभाषणात म्हटल्याचे एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली आहे.

कोणते गुन्हे दाखल?

- कलम 153, 120 (ब) आणि 34 अंतर्गत गुन्हे दाखल - कलम 153 - दोन समाजात तेढ निर्माण करून लोकांना भडकावणं- कलम 120 (ब) - तोडफोडीच्या कटाचा आरोप - कलम 34 - तोडफोडीमध्ये सहभागी होण्याचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close