S M L

आरुषी हत्याप्रकरणाची फाईल सीबीआयनं बंद केली

29 डिसेंबरनोएडातल्या आरुषी तलवार हत्याप्रकरणाची फाईल सीबीआयनं बंद केली. याबाबतचा अहवाल सीबीआयने गाझियाबाद कोर्टात आज सादर केला. आरुषी हत्येचे प्रकरण चौकशीच्या पलीकडे गेले आहे. त्यात सुधारणा होण शक्य नाही, असं सीबीआयने अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे अतिशय वाईट पद्धतीने हाताळले गेल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.आरुषी हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी टीम स्थापन करण्यात आली होती. पण त्या टीमला फक्त आरुषीचा मोबाईल शोधणं शक्य झाल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. मे 2008 मध्ये आरुषी तलवार ही 14 वर्षांची शाळकरी मुलगी तिच्या नोएडातल्या घरात मृतावस्थेत आढळली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2010 06:06 PM IST

29 डिसेंबर

नोएडातल्या आरुषी तलवार हत्याप्रकरणाची फाईल सीबीआयनं बंद केली. याबाबतचा अहवाल सीबीआयने गाझियाबाद कोर्टात आज सादर केला. आरुषी हत्येचे प्रकरण चौकशीच्या पलीकडे गेले आहे. त्यात सुधारणा होण शक्य नाही, असं सीबीआयने अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे अतिशय वाईट पद्धतीने हाताळले गेल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.आरुषी हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी नवी टीम स्थापन करण्यात आली होती. पण त्या टीमला फक्त आरुषीचा मोबाईल शोधणं शक्य झाल्याचे सीबीआयने म्हटलं आहे. मे 2008 मध्ये आरुषी तलवार ही 14 वर्षांची शाळकरी मुलगी तिच्या नोएडातल्या घरात मृतावस्थेत आढळली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2010 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close