S M L

महालक्ष्मी मंदिराच्या प्रसादाच्या कंत्राटावरुन वाद

30 डिसेंबरकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात देवस्थान समिती आणि लाडू कंत्राटदार यांच्यात वाद रंगला. महालक्ष्मी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. हा ठेका कोणत्या कंत्राटदारांना द्यायचा याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घेते. पण ही समिती धनदांडग्या लोकांनाच ठेका देते असा कंत्राटदारांचा आरोप आहे. त्यामुळे कंत्रााटदारांनी याविरुध्द थेट न्यायालयातच धाव घेतली. त्यातच समितीने ठेकेदारांकडून घेण्यात येणार्‍या अनामत रकमेत थेट 75 हजार रुपयांची वाढ केली. त्यामुळे छोट्या ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान समितीने सर्व आरोप फेटाळले. तसेच ठेका पध्दतीत सुधारणा करण्यासाठी वाढीव अनामत रकमेचे समर्थन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 09:44 AM IST

महालक्ष्मी मंदिराच्या प्रसादाच्या कंत्राटावरुन वाद

30 डिसेंबर

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात देवस्थान समिती आणि लाडू कंत्राटदार यांच्यात वाद रंगला. महालक्ष्मी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. हा ठेका कोणत्या कंत्राटदारांना द्यायचा याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घेते. पण ही समिती धनदांडग्या लोकांनाच ठेका देते असा कंत्राटदारांचा आरोप आहे. त्यामुळे कंत्रााटदारांनी याविरुध्द थेट न्यायालयातच धाव घेतली. त्यातच समितीने ठेकेदारांकडून घेण्यात येणार्‍या अनामत रकमेत थेट 75 हजार रुपयांची वाढ केली. त्यामुळे छोट्या ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान समितीने सर्व आरोप फेटाळले. तसेच ठेका पध्दतीत सुधारणा करण्यासाठी वाढीव अनामत रकमेचे समर्थन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close