S M L

नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर कोर्टाला शरण ; जामीन मंजूर

30 डिसेंबरपुणे बंद प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि भाजपचे 12 तर शिवसेनेचे 2 नगरसेवक शिवाजीनगर कोर्टात हजर झाले आहे. या दोघांनी अटक पुर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने सुनावणी देताना 15 हजारांचा दंड देत जामिन अर्ज मंजूर केला आहे. महानगरपालिकेत तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना-भाजपच्या 23 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 14 नगरसेवक आजकोर्टात हजर झाले. हजर झालेल्या या 14 नगरसेवकांना 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला. पुण्यात दादोजींच्या पुतळा हटवण्यावरुन पुणे बंद पुकरण्यात आला होता. नीलम गोर्‍हे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या सांगण्यावरुन पुण्यात तोडफोड करण्याचे उघडकीस आले होते. या दोघांचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान आज (गुरूवारी) शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज काँग्रेसने निदर्शन केली. पुण्यात बंददरम्यान दंगल भडकवणे आणि तोडफीडाला चिथावणी दिल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात याबाबत झालेलं संभाषण रेकॉर्ड करुन त्या आधारावर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान रेकॉर्ड केलेल्या संभाषणाची टेप फॉरेन्सिक लॅबकडे टेस्टसाठी पाठवण्यात आली. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 10:18 AM IST

नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर कोर्टाला शरण ; जामीन मंजूर

30 डिसेंबरपुणे बंद प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि भाजपचे 12 तर शिवसेनेचे 2 नगरसेवक शिवाजीनगर कोर्टात हजर झाले आहे. या दोघांनी अटक पुर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने सुनावणी देताना 15 हजारांचा दंड देत जामिन अर्ज मंजूर केला आहे. महानगरपालिकेत तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना-भाजपच्या 23 नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 14 नगरसेवक आजकोर्टात हजर झाले. हजर झालेल्या या 14 नगरसेवकांना 15 हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला. पुण्यात दादोजींच्या पुतळा हटवण्यावरुन पुणे बंद पुकरण्यात आला होता. नीलम गोर्‍हे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या सांगण्यावरुन पुण्यात तोडफोड करण्याचे उघडकीस आले होते. या दोघांचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान आज (गुरूवारी) शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पुण्यात आज काँग्रेसने निदर्शन केली. पुण्यात बंददरम्यान दंगल भडकवणे आणि तोडफीडाला चिथावणी दिल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात याबाबत झालेलं संभाषण रेकॉर्ड करुन त्या आधारावर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान रेकॉर्ड केलेल्या संभाषणाची टेप फॉरेन्सिक लॅबकडे टेस्टसाठी पाठवण्यात आली. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close