S M L

नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर यांच्या विरोधात स्वाभिमान संघटेनचं आंदोलन

30 डिसेंबरपुणे बंद प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर यांना जामीन मंजूर झाली असली तरी याप्रकरणाचे पडसाद आज इतर ठिकाणीही उमटले. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज शिवसेनेचा कट्टर विरोधक मानल्या जाणार्‍या स्वाभिमानी संघटेनने आंदोलन केले. संघटनेच्या कार्यकत्यंानी निलम गोर्‍हे आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत निलम गोर्‍हेच्या पुतळ्याचे दहन केले. पुण्यातील जंगली महाराज रोडवर असलेल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. नीलम गोर्‍हे आणि मिंलिद नार्वेकरांनी शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.नाशिकमध्येही याचे पडसाद उमटले. शालीमार आणि मेनरोड या परिसरात शिवसैनिकांनी जबरदस्तीने दुकान बंद केली. तसेच पुण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2010 03:17 PM IST

नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर यांच्या विरोधात स्वाभिमान संघटेनचं आंदोलन

30 डिसेंबर

पुणे बंद प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि नार्वेकर यांना जामीन मंजूर झाली असली तरी याप्रकरणाचे पडसाद आज इतर ठिकाणीही उमटले. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज शिवसेनेचा कट्टर विरोधक मानल्या जाणार्‍या स्वाभिमानी संघटेनने आंदोलन केले. संघटनेच्या कार्यकत्यंानी निलम गोर्‍हे आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करत निलम गोर्‍हेच्या पुतळ्याचे दहन केले. पुण्यातील जंगली महाराज रोडवर असलेल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. नीलम गोर्‍हे आणि मिंलिद नार्वेकरांनी शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नाशिकमध्येही याचे पडसाद उमटले. शालीमार आणि मेनरोड या परिसरात शिवसैनिकांनी जबरदस्तीने दुकान बंद केली. तसेच पुण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2010 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close