S M L

पुणे नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज ;तळीरामांसाठी पोलिसांची खास मोहिम

31 डिसेंबरनवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. यंदा पुण्यातल्या हॉटेल्स आणि बारला दिड वाजेपर्यंतची खास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे यंदा सेलिब्रेशन साठी खास तयारी हॉटेल चालकांनी केली आहे.हॉटेल्स मध्ये सिक्युरिटीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पण या वर्षी या सगळ्या सेलिब्रेशन वर करडी नजर असणार आहे ती पुणे पोलिसांची. ड्रंकन ड्रायव्हींग साठी पोलिसांनी खास कॅम्पेन हाती घेतले आहे. ठिकठिकाणी 600 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जर ड्रायव्हरने दारु पिलेली असतील तर गाडीतल्या इतर लोकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटिल यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 11:59 AM IST

पुणे नव वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज ;तळीरामांसाठी पोलिसांची खास मोहिम

31 डिसेंबर

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. यंदा पुण्यातल्या हॉटेल्स आणि बारला दिड वाजेपर्यंतची खास परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे यंदा सेलिब्रेशन साठी खास तयारी हॉटेल चालकांनी केली आहे.हॉटेल्स मध्ये सिक्युरिटीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पण या वर्षी या सगळ्या सेलिब्रेशन वर करडी नजर असणार आहे ती पुणे पोलिसांची. ड्रंकन ड्रायव्हींग साठी पोलिसांनी खास कॅम्पेन हाती घेतले आहे. ठिकठिकाणी 600 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जर ड्रायव्हरने दारु पिलेली असतील तर गाडीतल्या इतर लोकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त मनोज पाटिल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close