S M L

पुण्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मागितला - आर. आर. पाटील

31 डिसेंबरपुण्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा पूर्ण अहवाल आपण मागितला आहे. पण फक्त राजकीय नेते म्हणून नाहीत तर पुण्यातली परिस्थिती बिघडू नये यासाठी काही पावलं उचलण्याची गरज होती त्यामुळे फोन टॅपिंग केलं गेलं असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदाच हे भाष्य केले. पुण्यात बंदच्या आदल्या दिवशी काही तणावाचे आणि तोडफोडीचे प्रसंग घडले होते. यातूनच हे फोन टॅपिंग करणं पोलिसांना भाग पडले असावे. आपण राजकीय नेत्यांचे फोन टॅप करू नयेत आणि केले जाणार नाहीत असं विधीमंडळात म्हणालो होतो. पण पुण्यातली परीस्थिती वेगळी होती हे लक्षात घ्यायला हवं असंही आर आर. म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 04:21 PM IST

पुण्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मागितला - आर. आर. पाटील

31 डिसेंबरपुण्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा पूर्ण अहवाल आपण मागितला आहे. पण फक्त राजकीय नेते म्हणून नाहीत तर पुण्यातली परिस्थिती बिघडू नये यासाठी काही पावलं उचलण्याची गरज होती त्यामुळे फोन टॅपिंग केलं गेलं असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी आर. आर. पाटील यांनी पहिल्यांदाच हे भाष्य केले.

पुण्यात बंदच्या आदल्या दिवशी काही तणावाचे आणि तोडफोडीचे प्रसंग घडले होते. यातूनच हे फोन टॅपिंग करणं पोलिसांना भाग पडले असावे. आपण राजकीय नेत्यांचे फोन टॅप करू नयेत आणि केले जाणार नाहीत असं विधीमंडळात म्हणालो होतो. पण पुण्यातली परीस्थिती वेगळी होती हे लक्षात घ्यायला हवं असंही आर आर. म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close