S M L

मानखुर्दमध्ये झोपडपट्टीला लागली आग

01 जानेवारीनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मानखुर्दच्या मंडाला भागात झोपडपट्टीला आग लागली. या आगीत अंदाजे 50 झोपड्या आणि 5 ते 6 गोदाम जळून खाक झाली आहे. मंडाला हा भाग संपूर्णपणे झोपडवस्तीचा भाग आहे. सकाळी सहा वाजता याच भागातल्या एका गोदामात आग लागली. इथं असलेल्या गोदामांत केमिकलचा स्टॉक असल्यामुळे स्फोट झाला. घटनास्थळी फ्रायर ब्रिगेडच्या 16 गाड्या रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग 2 तास अथक प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे मालमत्तेची मोठी हानी झाली असली तरी सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 09:46 AM IST

मानखुर्दमध्ये झोपडपट्टीला लागली आग

01 जानेवारी

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मानखुर्दच्या मंडाला भागात झोपडपट्टीला आग लागली. या आगीत अंदाजे 50 झोपड्या आणि 5 ते 6 गोदाम जळून खाक झाली आहे. मंडाला हा भाग संपूर्णपणे झोपडवस्तीचा भाग आहे. सकाळी सहा वाजता याच भागातल्या एका गोदामात आग लागली. इथं असलेल्या गोदामांत केमिकलचा स्टॉक असल्यामुळे स्फोट झाला. घटनास्थळी फ्रायर ब्रिगेडच्या 16 गाड्या रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग 2 तास अथक प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे मालमत्तेची मोठी हानी झाली असली तरी सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close