S M L

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला अटक

01 जानेवारीहुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्याआधी गजाआड होण्याची वेळ औरंगाबाद इथं आली. विशेष म्हणजे खुद्द नवरी मुलीनंच नवरदेवाविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. हुंडा मागणार्‍या मुलासोबत आपण लग्न करणार नाही असं ठणकावून सांगितलं. शेखर बनकर आणि स्वाती राव यांचे लग्न आज दुपारी एक वाजता औरंगाबादच्या बालाजी कार्यालयात होणार होतं. मात्र आधी हुंड्याचे पैसे द्या, मगच बोहल्यावर चढू असा हट्टा नवर्‍याने धरला. वडीलधार्‍यांनी समजावून सांगितल्यानंतरही शेखर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे स्वाती आणि तिच्या आईने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आणि दोघींनी पोलिसात जाऊन शेखरच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी शेखरला अटक केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2011 02:56 PM IST

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला अटक

01 जानेवारी

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला बोहल्यावर चढण्याआधी गजाआड होण्याची वेळ औरंगाबाद इथं आली. विशेष म्हणजे खुद्द नवरी मुलीनंच नवरदेवाविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. हुंडा मागणार्‍या मुलासोबत आपण लग्न करणार नाही असं ठणकावून सांगितलं. शेखर बनकर आणि स्वाती राव यांचे लग्न आज दुपारी एक वाजता औरंगाबादच्या बालाजी कार्यालयात होणार होतं. मात्र आधी हुंड्याचे पैसे द्या, मगच बोहल्यावर चढू असा हट्टा नवर्‍याने धरला. वडीलधार्‍यांनी समजावून सांगितल्यानंतरही शेखर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे स्वाती आणि तिच्या आईने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आणि दोघींनी पोलिसात जाऊन शेखरच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी शेखरला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2011 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close