S M L

भारतीय एअर फोर्सच्या कॅलेंडरवर सचिन तेंडुलकर झळकला

02 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता भारतीय एअर फोर्सच्या कॅलेंडरवर झळकत आहे. 2011 साठी एअर फोर्सने हे कॅलेंडर प्रसिद्ध केलं. एअर फोर्सच्या वतीने अलीकडेच त्याला ग्रुप कॅप्टन पदाचा बहुमान प्रदान करण्यात आला होता. हिरव्या रंगाचा फ्लाइंग सुट घातलेला आणि हातात हेल्मेट घेतलेला ग्रुप कॅप्टन सचिन सुखोई या लढाऊ विमानाच्या बाजूला उभा असल्याचा फोटो या कॅलेंडरमध्ये आहे. सचिनने याच सुखोई विमानातून उड्डाण करण्याची इच्छा एअर फोर्सकडे व्यक्त केली होती आणि आता दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरुन परतल्यानंतर त्याची ही इच्छा पुर्ण होण्याची शक्यता आहे. या कॅलेंडरचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरवर फक्त सचिन तेंडुलकरचाच समावेश आहे.जानेवारी महिन्याच्या पानावर सचिनचा हा फोटो आहे. या फोटोनंतर एअर फोर्सच्या विविध लढाऊ विमानांचे फोटो या कॅलेंडरमध्ये आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 11:09 AM IST

भारतीय एअर फोर्सच्या कॅलेंडरवर सचिन तेंडुलकर झळकला

02 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता भारतीय एअर फोर्सच्या कॅलेंडरवर झळकत आहे. 2011 साठी एअर फोर्सने हे कॅलेंडर प्रसिद्ध केलं. एअर फोर्सच्या वतीने अलीकडेच त्याला ग्रुप कॅप्टन पदाचा बहुमान प्रदान करण्यात आला होता. हिरव्या रंगाचा फ्लाइंग सुट घातलेला आणि हातात हेल्मेट घेतलेला ग्रुप कॅप्टन सचिन सुखोई या लढाऊ विमानाच्या बाजूला उभा असल्याचा फोटो या कॅलेंडरमध्ये आहे. सचिनने याच सुखोई विमानातून उड्डाण करण्याची इच्छा एअर फोर्सकडे व्यक्त केली होती आणि आता दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरुन परतल्यानंतर त्याची ही इच्छा पुर्ण होण्याची शक्यता आहे. या कॅलेंडरचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरवर फक्त सचिन तेंडुलकरचाच समावेश आहे.जानेवारी महिन्याच्या पानावर सचिनचा हा फोटो आहे. या फोटोनंतर एअर फोर्सच्या विविध लढाऊ विमानांचे फोटो या कॅलेंडरमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close