S M L

अहमदनगरजवळ क्वालीस अपघातात 4 जणांचा मृत्यू

02 जानेवारी अहमदनगर बीड रस्त्यावरील मदडगाव शिवारात क्वालीस गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हे चौघं कर्नाटकातील बिदर इथं राहणार होते.साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असताना या गाडीचा अपघात झाला. जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेले चौघंही एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांनी गाडीच्या ड्रायव्हरला अटक केली.  कर्नाटक मधील बीदर तालुक्यातील आठ साईभक्त परळी वैजनाथचे दर्शन घेऊन साईदर्शनासाठी शिर्डीला येत होते. पहाटेच्या सुमारास चालक सुधाकर बिरादर याला डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर आदळली. यामध्ये एकाच कुटूंबातील चारजण ठार झाले आहेत. मल्लिकाअर्जून पराप्पा लिंगप्पा, पद्मा उर्फ कविता मल्लिकाअर्जून लिंगप्पा आणि गिरीजा मल्लिकाअर्जून लिंगप्पा (मुलगी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर बेलाप्पा याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील उर्वरीत तीन जण जबर जखमी झाले आहेत. 

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 03:06 PM IST

अहमदनगरजवळ क्वालीस अपघातात 4 जणांचा मृत्यू

02 जानेवारी

 

अहमदनगर बीड रस्त्यावरील मदडगाव शिवारात क्वालीस गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. हे चौघं कर्नाटकातील बिदर इथं राहणार होते.साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असताना या गाडीचा अपघात झाला. जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेले चौघंही एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांनी गाडीच्या ड्रायव्हरला अटक केली.

 

कर्नाटक मधील बीदर तालुक्यातील आठ साईभक्त परळी वैजनाथचे दर्शन घेऊन साईदर्शनासाठी शिर्डीला येत होते. पहाटेच्या सुमारास चालक सुधाकर बिरादर याला डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर आदळली. यामध्ये एकाच कुटूंबातील चारजण ठार झाले आहेत. मल्लिकाअर्जून पराप्पा लिंगप्पा, पद्मा उर्फ कविता मल्लिकाअर्जून लिंगप्पा आणि गिरीजा मल्लिकाअर्जून लिंगप्पा (मुलगी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर बेलाप्पा याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील उर्वरीत तीन जण जबर जखमी झाले आहेत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close