S M L

कोल्हापूरमध्ये संस्थापकांची मराठी शाळा वाचवा मोहीम

02 जानेवारीमराठी शाळांबाबतच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आता संस्थाचालकांनी नवीन मोहीम उघडली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले संस्थाचालक मराठी शाळा वाचवा शिक्षण हक्क समन्वय समितीच्या माध्यमातुन एकत्र आले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 53 संस्थाचालकांची आज कोल्हापूरातल्या सृजन आनंद विद्यालयामध्ये बैठक झाली. त्याचबरोबर येत्या चार जानेवाराली शिक्षण मंत्र्यांना भेट घेण्याचे ठरवण्यात आलं आहे. शासनाने तात्काळ मराठी शाळेबाबतचे धोरण बदलावे यासाठी सरकारला भाग पाडण्याचं ह्या बैठकीत ठरविण्यात आलं.2006 पासून राज्य सरकारने मराठी शाळांना मान्यता देणं थांबवलं आहे. एकीकडे मान्यता द्यायच्या नाहीत आणि दुसरीकडे मान्यता नसलेली शाळा चालवली तर फौजदारी कारवाई करायची, असं दुटप्पी धोरणं सरकार मराठी शाळांबाबत चालवतं आहे. त्यामुळे खाजगी मराठी शाळेच्या शिक्षण संस्थाचालकांमधुन संताप व्यक्त होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 03:13 PM IST

कोल्हापूरमध्ये संस्थापकांची मराठी शाळा वाचवा मोहीम

02 जानेवारी

मराठी शाळांबाबतच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आता संस्थाचालकांनी नवीन मोहीम उघडली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातले संस्थाचालक मराठी शाळा वाचवा शिक्षण हक्क समन्वय समितीच्या माध्यमातुन एकत्र आले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 53 संस्थाचालकांची आज कोल्हापूरातल्या सृजन आनंद विद्यालयामध्ये बैठक झाली. त्याचबरोबर येत्या चार जानेवाराली शिक्षण मंत्र्यांना भेट घेण्याचे ठरवण्यात आलं आहे. शासनाने तात्काळ मराठी शाळेबाबतचे धोरण बदलावे यासाठी सरकारला भाग पाडण्याचं ह्या बैठकीत ठरविण्यात आलं.

2006 पासून राज्य सरकारने मराठी शाळांना मान्यता देणं थांबवलं आहे. एकीकडे मान्यता द्यायच्या नाहीत आणि दुसरीकडे मान्यता नसलेली शाळा चालवली तर फौजदारी कारवाई करायची, असं दुटप्पी धोरणं सरकार मराठी शाळांबाबत चालवतं आहे. त्यामुळे खाजगी मराठी शाळेच्या शिक्षण संस्थाचालकांमधुन संताप व्यक्त होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close