S M L

अखेर आदर्श 'अधिकार्‍यांचा' राजीनामा

03 जानेवारीआदर्श सोसायटी प्रकरणी हटवादीपणा करत राज्य सरकारलाच उडवून लावणारे राज्य मानवी आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्याचाच हा दणका आहे. राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. राज्य सरकारला आपला राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही असं इतके दिवस म्हणणार्‍या लालांनी आपला राजीनामा दिला. आता आपल्याच म्हणण्यावर पलटी मारत राजीनामा देण्याची वेळा लालांवर आली.गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याची सुचना केली होती. पण त्यांनी सरकारलाच आव्हान दिलं होतं. आदर्श प्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांनी सुद्धा आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट मिळवला होता. सुभाष लाला यांनी राजीनामा दिला असला तरी रामानंद तिवारी यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत ते राजीनामा देणार अशी माहिती मिळत आहे.या अधिकार्‍यांच्या राजीनाम्यावर न थांबता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.सीबीआय अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शक्यता आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोणत्याही क्षणी दोषी अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे. संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारावर एफआयआर दाखल केली जाऊ शकते. सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वीच 18 जणांविरुद्ध रिपोर्ट तयार केला होता. पण त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव असल्याने एफआयआर दाखल करु नये यासाठी सीबीआयवर दबाव येत होता. मात्र आज दिल्लीतून याप्रकरणी हालचाल होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकार्‍यांकडून ठोस पुरावे मिळण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 09:30 AM IST

अखेर आदर्श 'अधिकार्‍यांचा' राजीनामा

03 जानेवारी

आदर्श सोसायटी प्रकरणी हटवादीपणा करत राज्य सरकारलाच उडवून लावणारे राज्य मानवी आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्याचाच हा दणका आहे. राज्यपालांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. राज्य सरकारला आपला राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही असं इतके दिवस म्हणणार्‍या लालांनी आपला राजीनामा दिला. आता आपल्याच म्हणण्यावर पलटी मारत राजीनामा देण्याची वेळा लालांवर आली.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याची सुचना केली होती. पण त्यांनी सरकारलाच आव्हान दिलं होतं. आदर्श प्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांनी सुद्धा आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट मिळवला होता. सुभाष लाला यांनी राजीनामा दिला असला तरी रामानंद तिवारी यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत ते राजीनामा देणार अशी माहिती मिळत आहे.या अधिकार्‍यांच्या राजीनाम्यावर न थांबता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.

सीबीआय अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शक्यता

आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोणत्याही क्षणी दोषी अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची शक्यता आहे. संरक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारावर एफआयआर दाखल केली जाऊ शकते. सीबीआयने दोन आठवड्यांपूर्वीच 18 जणांविरुद्ध रिपोर्ट तयार केला होता. पण त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव असल्याने एफआयआर दाखल करु नये यासाठी सीबीआयवर दबाव येत होता. मात्र आज दिल्लीतून याप्रकरणी हालचाल होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकार्‍यांकडून ठोस पुरावे मिळण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close