S M L

सुबोधकुमार शर्मा नवे मुंबईमहापालिकेच्या कमिशनर

03 जानेवारीस्वाधीन क्षत्रिय यांची मुंबईच्या कमिशनरपदावरून बदली झली आहे. सुबोधकुमार शर्मा नवे मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर असतील. स्वाधिन क्षत्रिय यांची महसूल विभागाच्या प्रधान सचिव पदी बढती मिळाली. आदर्शच्या बिल्डींगला जास्त एफएसआय देण्याबाबत स्वाधीन क्षत्रिय यांच्यावर आरोप झाले होते. हा एफएसआय दिला गेला तेव्हा क्षत्रिय बेस्टचे प्रमुख होते. मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच होत आहे त्यामुळे सत्ताधारी युतीवर अंकुश ठेवण्यासाठीच सुबोधकुमारांसारखा कडक अधिकारी आणल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. राज्यसेवेत असणारे सुबोधकुमार हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. ते टेलीकॉम खात्याचे सचिव म्हणून याआधी दोन वर्ष काम पाहत होते आणि त्याआधी ते अर्थखात्यात प्रधान सचिव म्हणून काम पाहत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2011 11:43 AM IST

सुबोधकुमार शर्मा नवे मुंबईमहापालिकेच्या कमिशनर

03 जानेवारी

स्वाधीन क्षत्रिय यांची मुंबईच्या कमिशनरपदावरून बदली झली आहे. सुबोधकुमार शर्मा नवे मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर असतील. स्वाधिन क्षत्रिय यांची महसूल विभागाच्या प्रधान सचिव पदी बढती मिळाली. आदर्शच्या बिल्डींगला जास्त एफएसआय देण्याबाबत स्वाधीन क्षत्रिय यांच्यावर आरोप झाले होते. हा एफएसआय दिला गेला तेव्हा क्षत्रिय बेस्टचे प्रमुख होते. मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच होत आहे त्यामुळे सत्ताधारी युतीवर अंकुश ठेवण्यासाठीच सुबोधकुमारांसारखा कडक अधिकारी आणल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे. राज्यसेवेत असणारे सुबोधकुमार हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. ते टेलीकॉम खात्याचे सचिव म्हणून याआधी दोन वर्ष काम पाहत होते आणि त्याआधी ते अर्थखात्यात प्रधान सचिव म्हणून काम पाहत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close