S M L

अलमट्टी धरणाची उंचीला विरोध; सांगलीत कृती समितीची स्थापना

04 जानेवारीअलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरीही रस्त्यावर उतरले. सांगली जिल्ह्यातील पलुस इथल्या दहा गावच्या लोकांनी एकत्र येऊन तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला.कृष्णा पाणी लवादानं अलमट्टी धरणाची उंची वाढवायला परवानगी दिल्यानं पश्चिम महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. 2005 च्या महापुरात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. याचा सगळ्यात जास्त फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला बसला होता. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यात आता हा निर्णय घेतल्यानं ग्रामस्थांच्या संतापात आणखीनच भर पडली. अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास सांगली जिल्ह्यातील 50 गावांना कायमच स्थलांतर करावे लागणार आहे. तर 300 गावांना पावसाळ्यात पर्यायी जागा शोधावी लागणार त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावं अशी मागणी स्थानिकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 10:38 AM IST

अलमट्टी धरणाची उंचीला विरोध; सांगलीत कृती समितीची स्थापना

04 जानेवारी

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकरीही रस्त्यावर उतरले. सांगली जिल्ह्यातील पलुस इथल्या दहा गावच्या लोकांनी एकत्र येऊन तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला.कृष्णा पाणी लवादानं अलमट्टी धरणाची उंची वाढवायला परवानगी दिल्यानं पश्चिम महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. 2005 च्या महापुरात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. याचा सगळ्यात जास्त फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला बसला होता. यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. त्यात आता हा निर्णय घेतल्यानं ग्रामस्थांच्या संतापात आणखीनच भर पडली. अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास सांगली जिल्ह्यातील 50 गावांना कायमच स्थलांतर करावे लागणार आहे. तर 300 गावांना पावसाळ्यात पर्यायी जागा शोधावी लागणार त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावं अशी मागणी स्थानिकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close