S M L

कोरागावच्या कृष्णापेठ यात्रेतील चविष्ट 'पानगे' ची परंपरा

प्रशांत कोरटकर, वर्धा 04 जानेवारीमहाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाची वेगळी परंपरा आणि खानपान आहे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील कोरा गावातील कृष्णापेठची यात्रा पानग्यांच्या चवीसाठी प्रसिध्द आहे. पानगे गव्हाच्या पिठापासून तयार केले जातात आणि निखार्‍यावर भाजले जातात. या निमित्तांनं हजारो कुटुंबं इथं पानग्यांचा स्वयंपाक करतात. कणकेचे गोळे निगुतीनं तयार करून त्याला गोवर्‍यांच्या निखार्‍यांवर कुरकुरीत भाजले जातात. यालाच पानगे असं म्हणतात. हे पानगे जितके वैशिष्ट्यपूर्ण तितकीच ती बनवण्याची पद्धतही. कोरागाव पेठमधल्या या यात्रेसाठी दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या संख्येने यात्रेकरु येतात. केवळ पानग्यांवर ही पंगत संपत नाही. तर हे पानगे वाढले जातात ते वांग्याच्या रस्सेदार भाजी सोबत. कृष्णापेठच्या या यात्रेत मग फर्मास बेत जमतो. तो पानगे, रसदार भाजी , भातआणि कढीचा. या यात्रेच्या निमित्यानं दूरदूर चे नातेवाईक एकत्र येतात आणि पानग्यांची चव चाखतात. पानगेच का करतात याची एक पंरपरा आहे. अशा प्रकारच्या उत्सवातूनच महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पदार्थांची चव चाखत येते. त्यामुळे बोचर्‍या थंडीत गरमा गरम पाणग्याचा स्वाद चाखायचा असेल तर कृष्णापेठ यात्रेत जायलाच हवं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 04:43 PM IST

कोरागावच्या कृष्णापेठ यात्रेतील चविष्ट 'पानगे' ची परंपरा

प्रशांत कोरटकर, वर्धा

04 जानेवारी

महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाची वेगळी परंपरा आणि खानपान आहे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील कोरा गावातील कृष्णापेठची यात्रा पानग्यांच्या चवीसाठी प्रसिध्द आहे. पानगे गव्हाच्या पिठापासून तयार केले जातात आणि निखार्‍यावर भाजले जातात. या निमित्तांनं हजारो कुटुंबं इथं पानग्यांचा स्वयंपाक करतात.

कणकेचे गोळे निगुतीनं तयार करून त्याला गोवर्‍यांच्या निखार्‍यांवर कुरकुरीत भाजले जातात. यालाच पानगे असं म्हणतात. हे पानगे जितके वैशिष्ट्यपूर्ण तितकीच ती बनवण्याची पद्धतही. कोरागाव पेठमधल्या या यात्रेसाठी दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या संख्येने यात्रेकरु येतात. केवळ पानग्यांवर ही पंगत संपत नाही. तर हे पानगे वाढले जातात ते वांग्याच्या रस्सेदार भाजी सोबत. कृष्णापेठच्या या यात्रेत मग फर्मास बेत जमतो. तो पानगे, रसदार भाजी , भातआणि कढीचा.

या यात्रेच्या निमित्यानं दूरदूर चे नातेवाईक एकत्र येतात आणि पानग्यांची चव चाखतात. पानगेच का करतात याची एक पंरपरा आहे. अशा प्रकारच्या उत्सवातूनच महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या पदार्थांची चव चाखत येते. त्यामुळे बोचर्‍या थंडीत गरमा गरम पाणग्याचा स्वाद चाखायचा असेल तर कृष्णापेठ यात्रेत जायलाच हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close