S M L

नवी मुंबईच्या व्यापार्‍यांना प्रतिक्षा चांगल्या कांद्याची

04 जानेवारीनवी मुंबईच्या ऐपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची समाधानकारक आवक झाली. नेहमी सरासरी 100 गाड्यांची आवक होत असते. पण आज आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव होलसेल बाजारात 5 रूपयांनी कमी झाले. आज होलसेल मार्केटमध्ये 40-45 रुपये किलोनं कांद्याची विक्री झाली आहे.आज एकूण 136 गाड्यांची आवक झाली. आवक वाढून देखील कांद्याचे भाव मात्र खूप कमी झालेले नाहीत. कारण अजूनही बाजारात येणारा कांदा हा खराब आहे. येत्या 15 ते 20 दिवसात चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात येणार असल्यानं कांद्याचे भाव कमी होतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 04:52 PM IST

नवी मुंबईच्या व्यापार्‍यांना प्रतिक्षा चांगल्या कांद्याची

04 जानेवारी

नवी मुंबईच्या ऐपीएमसी बाजारपेठेत आज कांद्याची समाधानकारक आवक झाली. नेहमी सरासरी 100 गाड्यांची आवक होत असते. पण आज आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव होलसेल बाजारात 5 रूपयांनी कमी झाले. आज होलसेल मार्केटमध्ये 40-45 रुपये किलोनं कांद्याची विक्री झाली आहे.आज एकूण 136 गाड्यांची आवक झाली. आवक वाढून देखील कांद्याचे भाव मात्र खूप कमी झालेले नाहीत. कारण अजूनही बाजारात येणारा कांदा हा खराब आहे. येत्या 15 ते 20 दिवसात चांगल्या प्रतिचा कांदा बाजारात येणार असल्यानं कांद्याचे भाव कमी होतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close