S M L

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तरुणांचा ओबामांना पाठिंबा

2 नोव्हेंबर , अमेरिकाअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. विशेषकरून ओबामा तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांचं पारडं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅक्केन यांच्यापेक्षा जड आहे. विशेषतः तरुण वर्गात ओबामा मॅक्केन यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचं एका मतदानपूर्व चाचणीतून आढळून आलंय. सीबीएस न्यूजनं ही चाचणी घेतली होती. ओहिओतल्या मियामी युनिव्हर्सिटीतल्या 59 टक्के तरुणांनी ओबामा यांना मत देण्याची तयारी केलीय. तर 37 टक्के तरुण मॅक्केन यांच्या बाजूने आहेत, असं त्यात आढळून आलं. ओहिओ, पेनन्सिल्व्हानिया, नॉर्थ कॅरोलिना आणि कोलोरॅडोमधल्या 25 हजार कॉलेज तरुणांनी मतदान केलं. त्यात 60 टक्के तरुणांनी ओबामांना पसंती दिली. ओबामा यांच्याकडून तरुण वर्गाला खूपच अपेक्षा आहेत. ओबामांच्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांपासून हे विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांना गोरा आणि काळा या भेदापलिकडे ओबामा घेऊन जातील. आणि जगाचा लीडर हे अमेरिकेचं स्थान पुन्हा भक्कम करतील, अशी खात्री व्यक्त करण्यात आलीय. तसंच, ओबामा अमेरिकेतला इराकमधला हस्तक्षेप कमी करून, चर्चेवर आधारित परराष्ट्र धोरणाला ओबामा चालना देतील, असा विश्वासही तरुण वर्गाला आहे. परराष्ट्र धोरणाबरोबरच अर्थकारण हा या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा असल्याचं तरुण वर्गाचं मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 08:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close