S M L

अखेर तापी पतसंस्थेविरुध्द 4 फौजदारी गुन्हे दाखल

05 जानेवारीराज्यातील घोटाळेबाज पतसंस्थेच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या तापी पतसंस्थेविरुध्द अखेर 4 फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुरेश बोरोले यांच्यासह 37 जणांविरुध्द 40 कोटीचा अपहार केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि डॉ.बोरोले यांचा मुलगा पंकज यालाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आलं आहे. ठेवीदारांच्या पैशांचा संचालक मंडळाने अपहार केल्याचे सरकारी लेखा परीक्षणात उघड झालं आहे. जळगाव आणि चोपडा या शहरातील पोलीस ठाण्यात 4 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील जळगाव इथं 8 कोटी तर चोपडा इथं 32 कोटीचा संगनमताने अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ठेवीदारांच्या पैश्यांचा परस्पर, विनापरवानगी संस्थेच्या इतर खाजगी संस्थासाठी वापर केल्यानं ही पतसंस्था डबघाईला आल्याचं लेखा परीक्षणात स्पष्ट झालं आहे. तापी पतसंस्थेविरुध्द अनेक तक्रारी दाखल झालेल्या असूनही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे नातेवाईक असल्याचा त्यांना फायदा मिळतो असा ठेवीदारांचा आरोप होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 09:52 AM IST

अखेर तापी पतसंस्थेविरुध्द 4 फौजदारी गुन्हे दाखल

05 जानेवारी

राज्यातील घोटाळेबाज पतसंस्थेच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या तापी पतसंस्थेविरुध्द अखेर 4 फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुरेश बोरोले यांच्यासह 37 जणांविरुध्द 40 कोटीचा अपहार केल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि डॉ.बोरोले यांचा मुलगा पंकज यालाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आलं आहे. ठेवीदारांच्या पैशांचा संचालक मंडळाने अपहार केल्याचे सरकारी लेखा परीक्षणात उघड झालं आहे. जळगाव आणि चोपडा या शहरातील पोलीस ठाण्यात 4 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील जळगाव इथं 8 कोटी तर चोपडा इथं 32 कोटीचा संगनमताने अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ठेवीदारांच्या पैश्यांचा परस्पर, विनापरवानगी संस्थेच्या इतर खाजगी संस्थासाठी वापर केल्यानं ही पतसंस्था डबघाईला आल्याचं लेखा परीक्षणात स्पष्ट झालं आहे. तापी पतसंस्थेविरुध्द अनेक तक्रारी दाखल झालेल्या असूनही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे नातेवाईक असल्याचा त्यांना फायदा मिळतो असा ठेवीदारांचा आरोप होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close