S M L

मुंबईत कोट्यावधी किमतीचं रक्तचंदन पकडलं

05 जानेवारीमुंबईहून दुबईला पाठवण्यात येणारे 26 मॅट्रीक टन रक्तचंदन कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई इथल्या जेएनपीटी बंदरात ही कारवाई करण्यात आली. वसईतून इक्रा एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने बोगस पेपर तयार करून रक्तचंदन दुबईला नेण्यात येत होते. मात्र याबाबत माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाच्या सेंट्रल इंटेलिजेंस यूनिटन कंटेनरची तपासणी केली. त्यात 2 कोटी 9 लाख रूपये किंमतीचं रक्तचंदन आढळलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सव्वा सहा कोटी रुपये आहे. वर्षभरातील तस्करीची ही 16 वी घटना आहे. पनवेल आणि रांजणगाव परिसरात रक्तचंदन तस्करी करणार्‍या 5 ते 6 टोळ्या कार्यरत असल्याचं कस्टम विभागानं म्हंटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 10:08 AM IST

मुंबईत कोट्यावधी किमतीचं रक्तचंदन पकडलं

05 जानेवारी

मुंबईहून दुबईला पाठवण्यात येणारे 26 मॅट्रीक टन रक्तचंदन कस्टम विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई इथल्या जेएनपीटी बंदरात ही कारवाई करण्यात आली. वसईतून इक्रा एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने बोगस पेपर तयार करून रक्तचंदन दुबईला नेण्यात येत होते. मात्र याबाबत माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाच्या सेंट्रल इंटेलिजेंस यूनिटन कंटेनरची तपासणी केली. त्यात 2 कोटी 9 लाख रूपये किंमतीचं रक्तचंदन आढळलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सव्वा सहा कोटी रुपये आहे. वर्षभरातील तस्करीची ही 16 वी घटना आहे. पनवेल आणि रांजणगाव परिसरात रक्तचंदन तस्करी करणार्‍या 5 ते 6 टोळ्या कार्यरत असल्याचं कस्टम विभागानं म्हंटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close