S M L

जळगावमध्ये ग्रामसेवकानं दिला खोटा वाळू उपशाचा ठेका !

05 जानेवारीग्रामसेवकाने गावकर्‍यांना आणि ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून वाळू उपशाचा खोटा ठेका दिल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला.अंमळनेर तालुक्यातल्या भिलाली गावातली ही घटना आहे. गावाजवळून जाणार्‍या पांझरा नदीतून वाळू उपसा करण्यासाठी अवघ्या 25 लाखाला ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराने लगेच बेसुमार उपसाही सुरू केला. पण ग्रामपंचायतीनं ठरावच केला नसल्यानं संतप्त गावकर्‍यांनी नदीपात्रातून ठेकेदाराला हुसकावून लावले. वाद चिघळला आणि गावकर्‍यांनी दगडफेक सुरु केली.अखेर आमदार साहेबराव पाटिल,तहसीलदार आणि पोलिसांचा ताफा नदीपात्रात आला तेंव्हा भलतीच बाब समोर आली. ग्रामसेवक नाना सोनावणे यानेच हा सगळा बनावट प्रकार केल्याचं उघडकीला आलं. आता प्रशासनाने ग्रामसेवकाला निलंबित केलं तरी कोणत्याही परिस्थितीत वाळू उपसा करु देणार नाही अशी भूमिका भिलालीच्या गावकर्‍यांनी घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 10:25 AM IST

जळगावमध्ये ग्रामसेवकानं दिला खोटा वाळू उपशाचा ठेका !

05 जानेवारी

ग्रामसेवकाने गावकर्‍यांना आणि ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून वाळू उपशाचा खोटा ठेका दिल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला.अंमळनेर तालुक्यातल्या भिलाली गावातली ही घटना आहे. गावाजवळून जाणार्‍या पांझरा नदीतून वाळू उपसा करण्यासाठी अवघ्या 25 लाखाला ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराने लगेच बेसुमार उपसाही सुरू केला. पण ग्रामपंचायतीनं ठरावच केला नसल्यानं संतप्त गावकर्‍यांनी नदीपात्रातून ठेकेदाराला हुसकावून लावले. वाद चिघळला आणि गावकर्‍यांनी दगडफेक सुरु केली.अखेर आमदार साहेबराव पाटिल,तहसीलदार आणि पोलिसांचा ताफा नदीपात्रात आला तेंव्हा भलतीच बाब समोर आली. ग्रामसेवक नाना सोनावणे यानेच हा सगळा बनावट प्रकार केल्याचं उघडकीला आलं. आता प्रशासनाने ग्रामसेवकाला निलंबित केलं तरी कोणत्याही परिस्थितीत वाळू उपसा करु देणार नाही अशी भूमिका भिलालीच्या गावकर्‍यांनी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close