S M L

सचिनची सुखोई सफरची इच्छा लवकरचं पूर्ण होणार

05 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नौदलाचा ग्रुप कॅप्टन झाल्यावर सुखोई विमानाची सफर करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आणि सचिनची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाने या सफरीला तत्त्वत: मान्यता दिली. आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरुही केली. पुण्यात लोहे-गावमधल्या नौदलाच्या विमानतळावरुन सचिन सुखोई उड्डाण करेल. पण सचिन नक्की कधी हे उड्डाण करणार हे अजून निश्चित झालेलं नाही. कारण प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी सचिनला नौदल आणि केंद्र सरकारच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. ही कागदोपत्री प्रक्रिया आहे आणि यासाठी पंधरा दिवस लागतील, असं एअरमार्शल अंजन कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सचिन दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून आला की सुखोई सफरीची तारीख नक्की करण्यात येणार आहे. सुखोई सफर करणारा सचिन हा एकमेव खेळाडू असेल. यापूर्वी फक्त राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनाच हा मान मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 10:50 AM IST

सचिनची सुखोई सफरची इच्छा लवकरचं पूर्ण होणार

05 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नौदलाचा ग्रुप कॅप्टन झाल्यावर सुखोई विमानाची सफर करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. आणि सचिनची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाने या सफरीला तत्त्वत: मान्यता दिली. आणि त्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरुही केली. पुण्यात लोहे-गावमधल्या नौदलाच्या विमानतळावरुन सचिन सुखोई उड्डाण करेल. पण सचिन नक्की कधी हे उड्डाण करणार हे अजून निश्चित झालेलं नाही. कारण प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी सचिनला नौदल आणि केंद्र सरकारच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. ही कागदोपत्री प्रक्रिया आहे आणि यासाठी पंधरा दिवस लागतील, असं एअरमार्शल अंजन कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सचिन दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून आला की सुखोई सफरीची तारीख नक्की करण्यात येणार आहे. सुखोई सफर करणारा सचिन हा एकमेव खेळाडू असेल. यापूर्वी फक्त राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनाच हा मान मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close