S M L

आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा- नांदगावकर

06 जानेवारीमनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. औरंगाबादमध्ये आज (गुरुवारी) नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांची तक्रार केली. आमदार जाधव यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान नांदगावकर यांनी जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नांदगावकर यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 09:55 AM IST

आमदार जाधव यांना मारहाण प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा- नांदगावकर

06 जानेवारी

मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. औरंगाबादमध्ये आज (गुरुवारी) नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांची तक्रार केली. आमदार जाधव यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान नांदगावकर यांनी जाधव यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. पोलिसांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नांदगावकर यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close