S M L

सध्या शिवसेनेत काम करण्यार्‍यांचे पंख छाटले जात आहे - पावसकर

06 जानेवारीशिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर किरण पावसकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्याचबरोबर आपण नाराज असल्याची चर्चा बाळासाहेब यांच्यापर्यंत पोहचली होती. सध्या शिवसेनेत काम करण्यार्‍यांचे पंख छाटले जातायेत ही वस्तुस्थिती बाळासाहेबांना माहिती आहे. तरीसुद्धा बाळासाहेब यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, असंही ते म्हणाले. याच पत्रकार परिषदेत पावसकर यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. आपल्या बरोबर भारतीय कामगार सेनेतून बाहेर पडलेल्या पदाधिकार्‍यांना त्रास देण्याचा किंवा धमकावण्याचा कुणी प्रयत्न केला तर आपण त्यांना पुरून उरू असा सज्जड दमही त्यांनी शिवसेनेला दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 10:56 AM IST

सध्या शिवसेनेत काम करण्यार्‍यांचे पंख छाटले जात आहे - पावसकर

06 जानेवारी

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर किरण पावसकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्याचबरोबर आपण नाराज असल्याची चर्चा बाळासाहेब यांच्यापर्यंत पोहचली होती. सध्या शिवसेनेत काम करण्यार्‍यांचे पंख छाटले जातायेत ही वस्तुस्थिती बाळासाहेबांना माहिती आहे. तरीसुद्धा बाळासाहेब यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, असंही ते म्हणाले. याच पत्रकार परिषदेत पावसकर यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. आपल्या बरोबर भारतीय कामगार सेनेतून बाहेर पडलेल्या पदाधिकार्‍यांना त्रास देण्याचा किंवा धमकावण्याचा कुणी प्रयत्न केला तर आपण त्यांना पुरून उरू असा सज्जड दमही त्यांनी शिवसेनेला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close