S M L

सेक्सवर्कर्स गिरवतायत बाराखडी !

असिफ मुरसल, सांगली06 जानेवारीसांगलीमध्ये एका वस्तीतल्या शाळेतून बाराखडीचे बोल ऐकू येऊ लागतात. आणि तेही मुलांचे नव्हे, तर महिलांचे. समाजातल्या या उपेक्षित घटकाला मग शिक्षणाची कवाडं खुली होऊ लागतात. प्रबोधनाची नांदी ऐकू येऊ लागते. ही शाळा सुरु करण्याचा पुढाकार पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी घेतला. सेक्सवर्कर म्हणून काम करणार्‍या गरीबीने गांजलेल्या अनेकजणी या व्यवसायात ढकलल्या जातात. कर्नाटकातून आलेल्या या बहुतेकजणी निरक्षर आहेत. आणि म्हणूनच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे असं मानून पत्रकार दीपक चव्हाण यांनी ही शाळा सुरु केली. आणि त्यासोबत सुरु झाला एका जिद्दीचा प्रवास. या शाळेत मराठी, अंकगणित, इंग्रजी, बँकिंग व्यवहार, सामान्य ज्ञान असे सगळे विषय शिकवले जातात. त्यामुळे या महिलांमध्ये आता परिवर्तन होताना दिसतंय. गेल्या वर्षापर्यंत सांगली जिल्हा एड्सच्या आकडेवारीमध्ये राज्यात आघाडीवर होता. पण जनजागृतीनंतर त्यात कमालीची घट झाली. त्यातच आता शिक्षण मिळत असल्यानं या महिलाही प्रचंड खूश आहेत. दीपक चव्हाणांच्या या प्रयत्नांना आता गरज आहे ती आपल्या सकारात्मक पाठिंब्याची.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 01:18 PM IST

सेक्सवर्कर्स गिरवतायत बाराखडी !

असिफ मुरसल, सांगली

06 जानेवारी

सांगलीमध्ये एका वस्तीतल्या शाळेतून बाराखडीचे बोल ऐकू येऊ लागतात. आणि तेही मुलांचे नव्हे, तर महिलांचे. समाजातल्या या उपेक्षित घटकाला मग शिक्षणाची कवाडं खुली होऊ लागतात. प्रबोधनाची नांदी ऐकू येऊ लागते. ही शाळा सुरु करण्याचा पुढाकार पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी घेतला.

सेक्सवर्कर म्हणून काम करणार्‍या गरीबीने गांजलेल्या अनेकजणी या व्यवसायात ढकलल्या जातात. कर्नाटकातून आलेल्या या बहुतेकजणी निरक्षर आहेत. आणि म्हणूनच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय आहे असं मानून पत्रकार दीपक चव्हाण यांनी ही शाळा सुरु केली. आणि त्यासोबत सुरु झाला एका जिद्दीचा प्रवास.

या शाळेत मराठी, अंकगणित, इंग्रजी, बँकिंग व्यवहार, सामान्य ज्ञान असे सगळे विषय शिकवले जातात. त्यामुळे या महिलांमध्ये आता परिवर्तन होताना दिसतंय. गेल्या वर्षापर्यंत सांगली जिल्हा एड्सच्या आकडेवारीमध्ये राज्यात आघाडीवर होता. पण जनजागृतीनंतर त्यात कमालीची घट झाली. त्यातच आता शिक्षण मिळत असल्यानं या महिलाही प्रचंड खूश आहेत. दीपक चव्हाणांच्या या प्रयत्नांना आता गरज आहे ती आपल्या सकारात्मक पाठिंब्याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close