S M L

मुंबई विद्यापीठाच्या हॉकी टीममध्ये भाविसेचा हस्तक्षेप

06 जानेवारीमुंबईत सध्या आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा सुरु आहे. पण या स्पर्धेत सध्या मराठी खेळाडूंचा मुद्दा गाजत आहे. शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाच्या टीममध्ये मराठी खेळाडूंना प्राधान्य मिळावं या मागणीसाठी पहिल्या दिवशी धुमाकूळ घातला. या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या टीमची निवड काल होणार होती. पण टीममध्ये हरयाणाच्या पाच हॉकीपटूंचा समावेश असल्यामुळे स्थानिक खेळाडू नाराज होते. भारतीय विद्यार्थी सेनेने अखेर यात हस्तक्षेप करुन निवड प्रक्रिया थांबवली. आणि हरयाणाच्या तीन खेळाडूंचं नाव टीममधून वगळण्यात आलं. हरयाणाचे हे खेळाडू मुंबईत शिकण्यासाठी आले. आणि खालसा कॉलेजमध्ये शिकतायत. नियमाप्रमाणे या खेळाडूंनी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नियमाप्रमाणे ऍडमिशन घेतलं. आणि टीमही गुणवत्तेच्या जोरावर निवडली जाते असे असतानाही भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यानी गुंडगिरी करून स्थानिक खेळाडूंचा मुद्दा पुढे करीत टीम निवडीत हस्तक्षेप केला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या गुंडगिरीबद्दल क्रीडा वर्तुळात संताप व्यक्त होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 02:04 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या हॉकी टीममध्ये भाविसेचा हस्तक्षेप

06 जानेवारी

मुंबईत सध्या आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा सुरु आहे. पण या स्पर्धेत सध्या मराठी खेळाडूंचा मुद्दा गाजत आहे. शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाच्या टीममध्ये मराठी खेळाडूंना प्राधान्य मिळावं या मागणीसाठी पहिल्या दिवशी धुमाकूळ घातला. या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या टीमची निवड काल होणार होती. पण टीममध्ये हरयाणाच्या पाच हॉकीपटूंचा समावेश असल्यामुळे स्थानिक खेळाडू नाराज होते. भारतीय विद्यार्थी सेनेने अखेर यात हस्तक्षेप करुन निवड प्रक्रिया थांबवली. आणि हरयाणाच्या तीन खेळाडूंचं नाव टीममधून वगळण्यात आलं. हरयाणाचे हे खेळाडू मुंबईत शिकण्यासाठी आले. आणि खालसा कॉलेजमध्ये शिकतायत. नियमाप्रमाणे या खेळाडूंनी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नियमाप्रमाणे ऍडमिशन घेतलं. आणि टीमही गुणवत्तेच्या जोरावर निवडली जाते असे असतानाही भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यानी गुंडगिरी करून स्थानिक खेळाडूंचा मुद्दा पुढे करीत टीम निवडीत हस्तक्षेप केला. भारतीय विद्यार्थी सेनेच्या गुंडगिरीबद्दल क्रीडा वर्तुळात संताप व्यक्त होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close