S M L

पुण्यातल्या अणे येथे 'भाकरी - आमटी' चा प्रसादासाठी भाविकांची गर्दी

06 जानेवारीएक लाखांहून अधिक बाजरीच्या गरमागरम भाकरी.50 जंबो लोखंडी कढईमधली चविष्ठ आमटी आणि त्याचा खमंग वास हे दृश्य आहे. पुणे जिल्ह्यातील 'अणे' इथल्या श्री रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवातलं. हा उत्सव दोन दिवस चालणार आहे. बुधवारपासून या उत्सवाला सुरूवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चवदार आमटीची चव चाखण्यासाठी राज्यभरातील भाविकांची इथं गर्दी झाली आहे. अणे गाव आणि परिसरांतील वाड्या-वस्त्यांमध्ये भाविक यासाठी देवस्थानाकडे बाजरीच्या भाकरी जमा करतात. तर आमटीसाठी हे भाविक देणग्या गोळा करतात.आणि मंदीर परिसरात ही आमटी तयार केली जाते. यासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण मंडळाचे 700 विद्यार्थी 2 दिवस काम करतात.आपल्या आगळ्यावेगळ्या आमटी-भाकरीच्या साध्या महाप्रसादामुळे हा उत्सव भाविकांना चांगलाच भावतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 04:10 PM IST

पुण्यातल्या अणे येथे 'भाकरी - आमटी' चा प्रसादासाठी भाविकांची गर्दी

06 जानेवारी

एक लाखांहून अधिक बाजरीच्या गरमागरम भाकरी.50 जंबो लोखंडी कढईमधली चविष्ठ आमटी आणि त्याचा खमंग वास हे दृश्य आहे. पुणे जिल्ह्यातील 'अणे' इथल्या श्री रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवातलं. हा उत्सव दोन दिवस चालणार आहे. बुधवारपासून या उत्सवाला सुरूवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चवदार आमटीची चव चाखण्यासाठी राज्यभरातील भाविकांची इथं गर्दी झाली आहे. अणे गाव आणि परिसरांतील वाड्या-वस्त्यांमध्ये भाविक यासाठी देवस्थानाकडे बाजरीच्या भाकरी जमा करतात. तर आमटीसाठी हे भाविक देणग्या गोळा करतात.आणि मंदीर परिसरात ही आमटी तयार केली जाते. यासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण मंडळाचे 700 विद्यार्थी 2 दिवस काम करतात.आपल्या आगळ्यावेगळ्या आमटी-भाकरीच्या साध्या महाप्रसादामुळे हा उत्सव भाविकांना चांगलाच भावतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close