S M L

पर्यावरण टीमची लवासाकडे कामाआधीच्या कागदपत्रांची मागणी

06 जानेवारीकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या टीमचा लवासा दौर्‍याचा आज दुसरा दिवस होता. टीमने लवासाला विरोध करणार्या ग्रामस्थांची भेट घेतली. यानंतर पर्यावरणवाद्यांनी ज्या बाबतीत आक्षेप घेतला त्या ठिकाणांचा दौराही केला. यावेऴी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि प्रकाश आंबेडकर उपस्थीत होते. लवासाच्या मुगाव परिसरात आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी सकाऴीच दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लवासाला विरोध करणार्‍या पाडावरच्या आदिवासी गावकर्‍यांची भेट घेतली. ही भेट सुरु असतांनाच लवासा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अशाच परिस्थितीत मेधा पाटकरांनी त्यांना असलेले आक्षेप या टीमसमोर मांडले. या नंतर टीमच्याच आग्रहामुळे त्यांनी ज्या ठिकाणांबाबत आक्षेप घेतले त्या ठिकाणांचा दौराही केला. पर्यावरण विभागाच्या समितीनं आता लवासाचं बांधकाम होण्यापूर्वी तसेच डोंगरतोड होण्यापूर्वीच्या फोटोंची आणि कागदपत्रांची मागणी केली आहे. उद्या या दौर्‍याचा शेवटचा दिवस असल्याने ही टीम प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचं समजतं. या समितीने दिलेल्या अहवालावरच लवासाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. दरम्यान लवासानं टीमकडे आतापर्यंत 10 हजार कागदपत्रं दिल्याची माहिती लवासानं दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 04:57 PM IST

पर्यावरण टीमची लवासाकडे कामाआधीच्या कागदपत्रांची मागणी

06 जानेवारी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या टीमचा लवासा दौर्‍याचा आज दुसरा दिवस होता. टीमने लवासाला विरोध करणार्या ग्रामस्थांची भेट घेतली. यानंतर पर्यावरणवाद्यांनी ज्या बाबतीत आक्षेप घेतला त्या ठिकाणांचा दौराही केला. यावेऴी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि प्रकाश आंबेडकर उपस्थीत होते. लवासाच्या मुगाव परिसरात आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी सकाऴीच दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लवासाला विरोध करणार्‍या पाडावरच्या आदिवासी गावकर्‍यांची भेट घेतली. ही भेट सुरु असतांनाच लवासा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. अशाच परिस्थितीत मेधा पाटकरांनी त्यांना असलेले आक्षेप या टीमसमोर मांडले. या नंतर टीमच्याच आग्रहामुळे त्यांनी ज्या ठिकाणांबाबत आक्षेप घेतले त्या ठिकाणांचा दौराही केला. पर्यावरण विभागाच्या समितीनं आता लवासाचं बांधकाम होण्यापूर्वी तसेच डोंगरतोड होण्यापूर्वीच्या फोटोंची आणि कागदपत्रांची मागणी केली आहे. उद्या या दौर्‍याचा शेवटचा दिवस असल्याने ही टीम प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचं समजतं. या समितीने दिलेल्या अहवालावरच लवासाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. दरम्यान लवासानं टीमकडे आतापर्यंत 10 हजार कागदपत्रं दिल्याची माहिती लवासानं दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close