S M L

शास्त्रज्ञ हजारे यांच्या सोनं संशोधनला यश

06 जानेवारीकोकणच्या भूमीत सध्या खाणींवरून वाद चालला आहे. पण इथे सोनं आहे याचा शोध कोल्हापूरच्या आर एच हजारे या शास्त्रज्ञानं लावला होता. पण त्यांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष झालं. एवढंच नाही तर त्यांना वेडं ठरवण्यात आलं. पण आता गोवा विद्यापीठाच्या निष्कर्षांमुळे हजारेंच्या संशोधनाला महत्त्व आलं. काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाने गोव्याच्या मातीत सोन्याचे अवषेश आहेत अशी माहिती आणि पुरावे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले. पण सिंधुदुर्गातल्या मातीतही सोन्याचे अवषेश आहेत हे पुरावे 2002 मध्येच आर एच हजारे यांनी दिले होते. हजारे त्यावेळी कोल्हापूर खनिकर्म विभागात रसायन शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. साधारण 1985 ते 88 या दरम्यान ते कोकणातील मातीत लोह खनिजाचे नमुने तपासत होते.त्यावेळी त्यांना मातीत सोन्याची झाक दिसली. याबद्दलची सगळी माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठांना संागितली आणि याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डिपार्टमेंटने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. सिंधुदुर्गातल्या भूमीत रेड्डी,सातेली,तिरोडा,कळणे या परिसरात लोह खनिज मोठ्या प्रमाणात निर्यात होतं पण त्यात सोनं आहे याचे अनेक पुरावे हजारेंनी सादर केले.एकीकडे याच संशोधनात मर्क्युरी पॉयझनिंगमुळे त्यांना अधुपण आलं तर दुसरीकडे त्यांना सक्तीची सेवा निवृत्तीही घ्यावी लागली.मात्र गोवा विद्यापीठाने यावर संशोधनाने शिक्कामोर्तब केला. आता यामुळे तरी हजारेंच्या संशोधनाचं मोल सगळ्यांना कळेल हीच अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 05:50 PM IST

शास्त्रज्ञ हजारे यांच्या सोनं संशोधनला यश

06 जानेवारी

कोकणच्या भूमीत सध्या खाणींवरून वाद चालला आहे. पण इथे सोनं आहे याचा शोध कोल्हापूरच्या आर एच हजारे या शास्त्रज्ञानं लावला होता. पण त्यांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष झालं. एवढंच नाही तर त्यांना वेडं ठरवण्यात आलं. पण आता गोवा विद्यापीठाच्या निष्कर्षांमुळे हजारेंच्या संशोधनाला महत्त्व आलं.

काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाने गोव्याच्या मातीत सोन्याचे अवषेश आहेत अशी माहिती आणि पुरावे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले. पण सिंधुदुर्गातल्या मातीतही सोन्याचे अवषेश आहेत हे पुरावे 2002 मध्येच आर एच हजारे यांनी दिले होते. हजारे त्यावेळी कोल्हापूर खनिकर्म विभागात रसायन शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. साधारण 1985 ते 88 या दरम्यान ते कोकणातील मातीत लोह खनिजाचे नमुने तपासत होते.त्यावेळी त्यांना मातीत सोन्याची झाक दिसली. याबद्दलची सगळी माहिती त्यांनी आपल्या वरिष्ठांना संागितली आणि याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डिपार्टमेंटने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. सिंधुदुर्गातल्या भूमीत रेड्डी,सातेली,तिरोडा,कळणे या परिसरात लोह खनिज मोठ्या प्रमाणात निर्यात होतं पण त्यात सोनं आहे याचे अनेक पुरावे हजारेंनी सादर केले.एकीकडे याच संशोधनात मर्क्युरी पॉयझनिंगमुळे त्यांना अधुपण आलं तर दुसरीकडे त्यांना सक्तीची सेवा निवृत्तीही घ्यावी लागली.मात्र गोवा विद्यापीठाने यावर संशोधनाने शिक्कामोर्तब केला. आता यामुळे तरी हजारेंच्या संशोधनाचं मोल सगळ्यांना कळेल हीच अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close