S M L

अनिल कुंबळेची टेस्टमधून निवृत्ती

2 नोव्हेंबर , दिल्लीभारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन अनिल कुंबळे याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दिल्ली टेस्टच्या शेवटच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुंबळेने निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या म्हणजेच नागपूर टेस्टसाठी त्यानं महेंद्रसिंग धोणीचं नाव कॅप्टन म्हणून सुचवलंय. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कुंबळेनं 3 विकेट घेतले होते. याआधीच कुंबळेनं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानं 29.59 च्या अ‍ॅव्हरेजनं 132 टेस्ट मॅचेसमध्ये 619 विकेट्स घेतल्या. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावरच त्यानं एका इनिंगमध्ये 10 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. त्याच्या करिअरमधली पाकिस्तान विरुद्धची हीच इनिंग त्याची सर्वोत्तम मानली जाते .149 रन्स देत 14 विकेट्स ही त्याची एका मॅचमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 11:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close