S M L

आयसीसी टेस्ट क्रमवारीत सचिन तेंडुलकर नंबर वन

07 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आयसीसी टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टेस्ट सीरिजमध्ये सचिननं दमदार कामगिरी केली. रेकॉर्डब्रेक पन्नासव्या सेंच्युरीबरोबरच त्यानं या सीरिजमध्ये 346 रन्स केले होते. सचिन तेंडुलकरबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर जॅक कॅलिसनंही सचिनबरोबर संयुक्तपणे नंबर वनचा क्रमांक पटकावला आहे. केपटाऊन टेस्टमध्ये कॅलिसनं दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी केली होती. त्यामुळे पाचव्या क्रमांकावरुन त्यानं अव्वल स्थानावर झेप घतेली. सचिन आणि कॅलिसच्या खात्यात 883 पॉईंट जमा झाले. टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची सचिनची ही तब्बल दहावी वेळ आहे. 1994 मध्ये सचिन पहिल्यांदा नंबर वन बनला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 05:48 PM IST

आयसीसी टेस्ट क्रमवारीत सचिन तेंडुलकर नंबर वन

07 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आयसीसी टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टेस्ट सीरिजमध्ये सचिननं दमदार कामगिरी केली. रेकॉर्डब्रेक पन्नासव्या सेंच्युरीबरोबरच त्यानं या सीरिजमध्ये 346 रन्स केले होते. सचिन तेंडुलकरबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर जॅक कॅलिसनंही सचिनबरोबर संयुक्तपणे नंबर वनचा क्रमांक पटकावला आहे. केपटाऊन टेस्टमध्ये कॅलिसनं दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी केली होती. त्यामुळे पाचव्या क्रमांकावरुन त्यानं अव्वल स्थानावर झेप घतेली. सचिन आणि कॅलिसच्या खात्यात 883 पॉईंट जमा झाले. टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची सचिनची ही तब्बल दहावी वेळ आहे. 1994 मध्ये सचिन पहिल्यांदा नंबर वन बनला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close