S M L

महाराष्ट्र गारठला ; अहमदनगरचा 1.7 पारा

08 जानेवारीउत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आली आहे. अहमदनगरमध्ये 1.7 सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. तर नाशिकचा पारा 5 डिग्रीपर्यंत खाली आला. नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातलं जनजीवन या थंडीनं विस्कळीत झालं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातले हे बदल होत असल्या निमित्तानं मेरी संस्थेत कार्यशाळा घेण्यात आली. उत्तरेतल्या थंड वार्‍यांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातली थंडी वाढल्याचं मत मेरीच्या मेट्रोलॉजी विभागाच्या उपसंचालकांनी मांडलंय. गेल्या आठ दिवसांपासून नागपूरमध्येही कडाक्याची थंडी आहे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात 6.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. बाहेर थंडी असल्यानं लोकं सकाळी सहसा बाहेर पडत नाही. उन्हाळ्यात 47 डिग्रीपर्यंत तापमान जाणार्‍या नागपूरकर थंडीची मजाही लुटत आहेत.तर, जळगावला 4.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जळगावात यंदा थंडीनं विक्रमी हजेरी लावली. गेल्या 4 दिवसांपासून तापमान जवळपास 3 अंशांनी घसरलं. शेकोटी पेटवून कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहे. गेल्या पंधरा वर्षात जळगावला नोंदवलेलं हे सगळ्यांत कमी तापमान ठरलंय. बाजारपेठेत थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे खरेदी करण्यासाठी बरीच गर्दी वाढली आहे. गरम कपडे, स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांची जोरदार विक्री सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 11:38 AM IST

महाराष्ट्र गारठला ; अहमदनगरचा 1.7 पारा

08 जानेवारी

उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आली आहे. अहमदनगरमध्ये 1.7 सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. तर नाशिकचा पारा 5 डिग्रीपर्यंत खाली आला. नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातलं जनजीवन या थंडीनं विस्कळीत झालं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातले हे बदल होत असल्या निमित्तानं मेरी संस्थेत कार्यशाळा घेण्यात आली. उत्तरेतल्या थंड वार्‍यांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातली थंडी वाढल्याचं मत मेरीच्या मेट्रोलॉजी विभागाच्या उपसंचालकांनी मांडलंय. गेल्या आठ दिवसांपासून नागपूरमध्येही कडाक्याची थंडी आहे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जानेवारी महिन्यात 6.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. बाहेर थंडी असल्यानं लोकं सकाळी सहसा बाहेर पडत नाही. उन्हाळ्यात 47 डिग्रीपर्यंत तापमान जाणार्‍या नागपूरकर थंडीची मजाही लुटत आहेत.

तर, जळगावला 4.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जळगावात यंदा थंडीनं विक्रमी हजेरी लावली. गेल्या 4 दिवसांपासून तापमान जवळपास 3 अंशांनी घसरलं. शेकोटी पेटवून कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करत आहे. गेल्या पंधरा वर्षात जळगावला नोंदवलेलं हे सगळ्यांत कमी तापमान ठरलंय. बाजारपेठेत थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे खरेदी करण्यासाठी बरीच गर्दी वाढली आहे. गरम कपडे, स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांची जोरदार विक्री सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close