S M L

आमदार मारहाण प्रकरणी 12 जानेवारीला राज ठाकरेंची निषेध सभा

08 जानेवारीकन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी अखेर राज ठाकरे यांनी मौन सोडलं. आमदार हर्षवर्धन जाधव हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना आता भेटण्याची परवानगी न्यायालयानं दिली नाही. येत्या 12 जानेवारीला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जाधव यांना भेटून संध्याकाऴी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर जाहीर निषेध सभा घेणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट करेन असंही ते म्हणाले. शिवाय हा मारहाणीचा प्रकार दिसतो तितका साधा नाही. त्याही पेक्षा अनेक गोष्टी त्यात आहेत. या सगळ्यांचा उलगडा मी 12 तारखेच्या जाहीर सभेत करेन असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2011 12:45 PM IST

आमदार मारहाण प्रकरणी 12 जानेवारीला राज ठाकरेंची निषेध सभा

08 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी अखेर राज ठाकरे यांनी मौन सोडलं. आमदार हर्षवर्धन जाधव हे न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना आता भेटण्याची परवानगी न्यायालयानं दिली नाही. येत्या 12 जानेवारीला न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जाधव यांना भेटून संध्याकाऴी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर जाहीर निषेध सभा घेणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट करेन असंही ते म्हणाले. शिवाय हा मारहाणीचा प्रकार दिसतो तितका साधा नाही. त्याही पेक्षा अनेक गोष्टी त्यात आहेत. या सगळ्यांचा उलगडा मी 12 तारखेच्या जाहीर सभेत करेन असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close