S M L

कराडमध्ये बिबट्याचा थरार आणि मृत्यू

9 जानेवारी, कराडकराडकरांनी रविवारी भर शहरात बिबट्याच्या हल्ल्याचा जीवघेणा थरार अनुभवला. कराडमधल्या शनिवार पेठेत बिबट्या घुसला. त्यानं पाचजणांना जखमी केलं. अखेर या बिबट्याला पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केलं. कराडमधल्या सिटी पोस्टाजवळ शनिवार पेठेत एक नर बिबट्या अचानक वस्तीत घुसला. यामुळे एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या येण्यामुळे गोंधळलेल्या माणसांचाही एकच गदारोळ झाला. या गोंधळात बिबट्याही आणखी बिथरला. आणि त्यानं समोर दिसेल त्याच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. त्यानं पाच जणांना जखमी केलं. सहाव्या माणसाच्या तर छातीवरच त्यानं झेप घेतली. सुदैवानंं अवघ्या काही मिनिटांतच पोलीस तिथे पोहोचले. कराड शहराचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास धस यांनी तातडीनं बिबट्यावर गोळ्या झाडण्याचा निर्णय घेतला. एक राऊंड फायर केल्यानंतरही बिबट्या आटोक्यात येईना. त्यामुळे त्यांनी आणखी दोन राऊंड फायर केले. या गोळीबारात बिबट्याचा मृत्यू ओढवला. आमचे सिटीझन जर्नलिस्ट सुरेश पवार यांनी आमच्यापर्यंत ही माहिती, फोटो आणि दृश्य पोहचवली. एवढं सगळं होऊनही भोवती जमलेल्या लोकांना विश्वास बसत नव्हता. बिबट्या ठार झालाय की नाही. हे ते पुन्हापुन्हा जवळ जाऊन ताडून बघत होते बिबट्या ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं तेव्हा कुठे सगळ्याच कराडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे सगळं होत असताना मग वनविभागाचे अधिकारी तिथे आले. आणि त्यांनी या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. बबट्याचा मृतदेह बिबट्याचा पोस्टमार्टमसाठी साता-याला नेण्यात आला आहे.कराडच्या अगाशिव नगर, पाटणच्या जंगलात गेले काही दिवस बिबट्याचा वावर होता. माणसांवर आणि प्राण्यांवरही बिबट्याचे हल्ले झाल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. पण बिबट्या त्यात सापडत नव्हता. अखेर आज कराडकरांना या जीवघेण्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2011 05:12 PM IST

कराडमध्ये बिबट्याचा थरार आणि मृत्यू

9 जानेवारी, कराड

कराडकरांनी रविवारी भर शहरात बिबट्याच्या हल्ल्याचा जीवघेणा थरार अनुभवला. कराडमधल्या शनिवार पेठेत बिबट्या घुसला. त्यानं पाचजणांना जखमी केलं. अखेर या बिबट्याला पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केलं.

कराडमधल्या सिटी पोस्टाजवळ शनिवार पेठेत एक नर बिबट्या अचानक वस्तीत घुसला. यामुळे एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या येण्यामुळे गोंधळलेल्या माणसांचाही एकच गदारोळ झाला. या गोंधळात बिबट्याही आणखी बिथरला. आणि त्यानं समोर दिसेल त्याच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. त्यानं पाच जणांना जखमी केलं. सहाव्या माणसाच्या तर छातीवरच त्यानं झेप घेतली. सुदैवानंं अवघ्या काही मिनिटांतच पोलीस तिथे पोहोचले. कराड शहराचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास धस यांनी तातडीनं बिबट्यावर गोळ्या झाडण्याचा निर्णय घेतला. एक राऊंड फायर केल्यानंतरही बिबट्या आटोक्यात येईना. त्यामुळे त्यांनी आणखी दोन राऊंड फायर केले. या गोळीबारात बिबट्याचा मृत्यू ओढवला. आमचे सिटीझन जर्नलिस्ट सुरेश पवार यांनी आमच्यापर्यंत ही माहिती, फोटो आणि दृश्य पोहचवली.

एवढं सगळं होऊनही भोवती जमलेल्या लोकांना विश्वास बसत नव्हता. बिबट्या ठार झालाय की नाही. हे ते पुन्हापुन्हा जवळ जाऊन ताडून बघत होते बिबट्या ठार झाल्याचं जाहीर करण्यात आलं तेव्हा कुठे सगळ्याच कराडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हे सगळं होत असताना मग वनविभागाचे अधिकारी तिथे आले. आणि त्यांनी या बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. बबट्याचा मृतदेह बिबट्याचा पोस्टमार्टमसाठी साता-याला नेण्यात आला आहे.

कराडच्या अगाशिव नगर, पाटणच्या जंगलात गेले काही दिवस बिबट्याचा वावर होता. माणसांवर आणि प्राण्यांवरही बिबट्याचे हल्ले झाल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. पण बिबट्या त्यात सापडत नव्हता. अखेर आज कराडकरांना या जीवघेण्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2011 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close