S M L

आमदार जाधव यांची हर्सुल कारागृहात रवानगी

11 जानेवारीपोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असलेले हर्षवर्धन जाधव यांना सरकारी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जाधव यांच्या प्रकृतीविषयीचा मेडिकल रिपोर्ट अजूनही कोर्टात सादर झाला नसल्यानं कोर्टानं सरकारी डॉक्टरांना नोटीस पाठवली. दरम्यान जाधव यांच्या जामीन अर्जावर दुपारी औरंगाबादच्या जिल्हान्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे उद्या म्हणजे बुधवारी औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू झाली. आमदार जाधवांना अजून जामीन मिळाला नसल्यानं नियमाप्रमाणे कारागृहात नेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.घटनाक्रम-5 जाने. हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केली-त्यात जाधव गंभीर जखमी झाले-त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं-7 जाने. खुल्ताबाद कोर्टासमोर हजर करण्यात आलं-कोर्टानं सरकारी हॉस्पीटलमधून त्यांच्या प्रकृतीचं प्रमाणपत्रं मागवलं-प्रमाणपत्रं न दिल्यानं सरकारी डॉक्टरांना कोर्टानं नोटीस पाठवली- नोटीस मिळताच जाधवांना आज डिस्चार्ज देण्यात आला- आज जाधव यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीये-तिथेच त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 08:11 AM IST

आमदार जाधव यांची हर्सुल कारागृहात रवानगी

11 जानेवारी

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असलेले हर्षवर्धन जाधव यांना सरकारी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जाधव यांच्या प्रकृतीविषयीचा मेडिकल रिपोर्ट अजूनही कोर्टात सादर झाला नसल्यानं कोर्टानं सरकारी डॉक्टरांना नोटीस पाठवली. दरम्यान जाधव यांच्या जामीन अर्जावर दुपारी औरंगाबादच्या जिल्हान्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे उद्या म्हणजे बुधवारी औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू झाली. आमदार जाधवांना अजून जामीन मिळाला नसल्यानं नियमाप्रमाणे कारागृहात नेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

घटनाक्रम

-5 जाने. हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केली-त्यात जाधव गंभीर जखमी झाले-त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं-7 जाने. खुल्ताबाद कोर्टासमोर हजर करण्यात आलं-कोर्टानं सरकारी हॉस्पीटलमधून त्यांच्या प्रकृतीचं प्रमाणपत्रं मागवलं-प्रमाणपत्रं न दिल्यानं सरकारी डॉक्टरांना कोर्टानं नोटीस पाठवली- नोटीस मिळताच जाधवांना आज डिस्चार्ज देण्यात आला- आज जाधव यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीये-तिथेच त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close