S M L

नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू

11 जानेवारीनाशिकमध्ये कांदा व्यापार्‍यांनी आंदोलन मागे घेतल्यावर आज सर्व बाजार समित्यांमधले लिलाव पुन्हा सुरू झाला. उत्तरेतल्या राज्यांनी 30 रू.पेक्षा कमी दरानं कांदा विक्रीची सक्ती केल्यानं व्यापार्‍यांनी कांदा लिलावावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर याबाबतच व्यापार्‍यांचं म्हणणं केंद्रापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही पणन संचालकांनी दिल्यावर कांद्याची खरेदी विक्री आज परत सुरू झाली. वाढत्या थंडीमुळे रब्बीतल्या कांद्याचं चांगलं उत्पादन निघणार आहे. त्यामुळे लवकरच कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजारात कांद्याची खरेदी जास्ती जास्त 25 रू. किलो दरानं सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 08:33 AM IST

नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू

11 जानेवारी

नाशिकमध्ये कांदा व्यापार्‍यांनी आंदोलन मागे घेतल्यावर आज सर्व बाजार समित्यांमधले लिलाव पुन्हा सुरू झाला. उत्तरेतल्या राज्यांनी 30 रू.पेक्षा कमी दरानं कांदा विक्रीची सक्ती केल्यानं व्यापार्‍यांनी कांदा लिलावावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर याबाबतच व्यापार्‍यांचं म्हणणं केंद्रापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही पणन संचालकांनी दिल्यावर कांद्याची खरेदी विक्री आज परत सुरू झाली. वाढत्या थंडीमुळे रब्बीतल्या कांद्याचं चांगलं उत्पादन निघणार आहे. त्यामुळे लवकरच कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजारात कांद्याची खरेदी जास्ती जास्त 25 रू. किलो दरानं सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close