S M L

फिक्सिंगमुळे खेळावर परिणाम झाला - सचिन

11 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारताच्या 1999 आणि 2000 मधील खराब फॉर्म बद्दल खुलासा केला. भारतीय टीमवर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे तो आणि संपूर्ण टीम हादरुन गेली होती. आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खेळावर झाला असं स्पष्टीकरण सचिननं दिलयं. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानंतर सर्वच क्रिकेटप्रेमी टीमकडे तिरक्या नजरेनं बघायचे प्रत्येक मॅचनंतर आणि प्रत्येक खराब विकेटनंतर फॅन्स कुजबूज करायचे आणि ते आमच्या जिव्हारी लागायचं. त्यामुळेच आपला आणि टीमचा खेळ ऑस्ट्रेलिया दौर्‍यात खराब झाला आणि भारताला 3-0 नं सपाटून मार खावा लागला असंही स्पष्टीकरण सचिननं एका दक्षिण आफ्रिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 11:08 AM IST

फिक्सिंगमुळे खेळावर परिणाम झाला - सचिन

11 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारताच्या 1999 आणि 2000 मधील खराब फॉर्म बद्दल खुलासा केला. भारतीय टीमवर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे तो आणि संपूर्ण टीम हादरुन गेली होती. आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या खेळावर झाला असं स्पष्टीकरण सचिननं दिलयं. मॅच फिक्सिंगच्या प्रकरणानंतर सर्वच क्रिकेटप्रेमी टीमकडे तिरक्या नजरेनं बघायचे प्रत्येक मॅचनंतर आणि प्रत्येक खराब विकेटनंतर फॅन्स कुजबूज करायचे आणि ते आमच्या जिव्हारी लागायचं. त्यामुळेच आपला आणि टीमचा खेळ ऑस्ट्रेलिया दौर्‍यात खराब झाला आणि भारताला 3-0 नं सपाटून मार खावा लागला असंही स्पष्टीकरण सचिननं एका दक्षिण आफ्रिकन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close