S M L

पत्रकार ढवळे यांची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

11 जानेवारीपत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. उद्या म्हणजेच बुधवारी जर ढवळे यांची सुटका झाली नाही तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील नेते, साहित्यिक आणि पत्रकारांनी हा इशारा दिला आहे. पत्रकार सुधीर ढवळे यांना गोंदिया पोलिसांनी दोन जानेवारी रोजी वर्धा इथून अटक केली. तेव्हापासून ते पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी 'सुधीर ढवळे मुक्तता अभियान' सुरु करण्यात आलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरु आहे. याबाबत गृहमंत्री आर.आर.पाटील यांची सुद्धा शिष्टमंडळाने भेट घेतली. पण या भेटीनंतरही कोणती कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर आज नरिमन पॉईट येथील जनता दलाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य , रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, ज.वि.पवार नेते उपस्थित होते.रामदास आठवले यांनी सुधीर ढवळे यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. तर भाई वैद्य यांनी हे सरकार सामान्यांना घाबरत आहे. म्हणून अशी दडपशाही करत असल्याचं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 02:43 PM IST

पत्रकार ढवळे यांची सुटका न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

11 जानेवारी

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत आहे. उद्या म्हणजेच बुधवारी जर ढवळे यांची सुटका झाली नाही तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील नेते, साहित्यिक आणि पत्रकारांनी हा इशारा दिला आहे. पत्रकार सुधीर ढवळे यांना गोंदिया पोलिसांनी दोन जानेवारी रोजी वर्धा इथून अटक केली. तेव्हापासून ते पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी 'सुधीर ढवळे मुक्तता अभियान' सुरु करण्यात आलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरु आहे. याबाबत गृहमंत्री आर.आर.पाटील यांची सुद्धा शिष्टमंडळाने भेट घेतली. पण या भेटीनंतरही कोणती कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर आज नरिमन पॉईट येथील जनता दलाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य , रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, ज.वि.पवार नेते उपस्थित होते.रामदास आठवले यांनी सुधीर ढवळे यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. तर भाई वैद्य यांनी हे सरकार सामान्यांना घाबरत आहे. म्हणून अशी दडपशाही करत असल्याचं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close