S M L

एका दिवसात 1 लाख खटले निकाली !

11 जानेवारीसुधाकर कांबळे, लोकमत-मुंबई राज्यातील सर्वचं कोर्टात लाखोंच्या संख्येन खटले प्रलंबित आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य विधी सेवा प्राधिकरणाने महा लोकअदालतचं आयोजन केलं आहे. यावेळी सुमारे एक लाख खटले निकालात काढण्यात येणार आहेत. 6 फेब्रुवारीला राज्यातल्या 500 कोर्टात हा उपक्रम राबवला जाईल. राज्यात अनेक प्रकारची कोर्ट आहेत. या कोर्टात गेल्या अनेक वर्षा पासून खटले सुरु आहे. काही खटले तर पंधरा- वीस वर्षा पासून सुरु आहेत. याचिकाकर्ते, तक्रारदार यांना केवळ तारखा मिळतात. पण निवाडा होत नाही. तो कधी होईल हे देखील सांगत येत नाही. या परिस्थितीमुळे आजमितीस प्रलंबीत असलेल्या खटल्यांची संख्या काही लाखंाच्या घरात आहे. या कोर्ट कचेरीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी राज्य विधी सेवा प्राधीकरण कार्यरत आहे. त्यांच्या महाअदालत मध्ये एकदा का निकाल झाला की मग त्या विरोधात कोणत्याही बाजूच्या व्यक्तीला कुठेही दाद मागता येणार नाही.राज्यात अनेक प्रकाचे कोर्ट आहेत. सेशन कोर्ट , मेट्रोपोलिटीन मॅजेस्ट्रेट कोर्ट , सिटी सिव्हील कोर्ट , डिस्ट्रिक्ट कोर्ट, या क्रिमिनल कोर्टात तसंच को-ऑपरेटिव्ह कोर्ट ,चॅरेटी कमिश्नर कोर्ट, कंझ्युमर कोर्ट, फॅमेली कोर्ट , इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट, ऍक्सीडेंट कोर्ट आदी कोर्टात चालणार्‍या खटल्यांवर महा अदालत मध्ये सुनावणी होणार आहे. नुकसान भरपाई बाबतचे अजून दाखल न झालेली प्रकरण जामिनीच्या वादा बाबतच्या तसंच विस्थापितांचे खटले महा अदालत मध्ये चालणार आहेत.यावेळी ज्या गुन्ह्यात मोठी शिक्षा होऊ शकते अशा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत महा अदालत मध्ये निकाल होणार नाही. या महाअदालत मध्ये एकदा का निकाल झाला की मग त्या विरोधात कोणत्याही बाजूच्या व्यक्तीस कुठे ही दाद मागता येणार नाही. तसेच न्याय करताना कुणावरही दबाव आणला जाणार नाही.ज्या कुणाला या न्याय अदालत मध्ये सहभागी व्हायचं आहे.त्यांनी त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाशी संपर्क साधावा असं आव्हान प्राधीकरणाचे अवर सचिव देवराव मोडेकर यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 03:00 PM IST

एका दिवसात 1 लाख खटले निकाली !

11 जानेवारी

सुधाकर कांबळे, लोकमत-मुंबई

राज्यातील सर्वचं कोर्टात लाखोंच्या संख्येन खटले प्रलंबित आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य विधी सेवा प्राधिकरणाने महा लोकअदालतचं आयोजन केलं आहे. यावेळी सुमारे एक लाख खटले निकालात काढण्यात येणार आहेत. 6 फेब्रुवारीला राज्यातल्या 500 कोर्टात हा उपक्रम राबवला जाईल. राज्यात अनेक प्रकारची कोर्ट आहेत. या कोर्टात गेल्या अनेक वर्षा पासून खटले सुरु आहे. काही खटले तर पंधरा- वीस वर्षा पासून सुरु आहेत. याचिकाकर्ते, तक्रारदार यांना केवळ तारखा मिळतात. पण निवाडा होत नाही. तो कधी होईल हे देखील सांगत येत नाही. या परिस्थितीमुळे आजमितीस प्रलंबीत असलेल्या खटल्यांची संख्या काही लाखंाच्या घरात आहे. या कोर्ट कचेरीतून लोकांची सुटका व्हावी यासाठी राज्य विधी सेवा प्राधीकरण कार्यरत आहे. त्यांच्या महाअदालत मध्ये एकदा का निकाल झाला की मग त्या विरोधात कोणत्याही बाजूच्या व्यक्तीला कुठेही दाद मागता येणार नाही.

राज्यात अनेक प्रकाचे कोर्ट आहेत. सेशन कोर्ट , मेट्रोपोलिटीन मॅजेस्ट्रेट कोर्ट , सिटी सिव्हील कोर्ट , डिस्ट्रिक्ट कोर्ट, या क्रिमिनल कोर्टात तसंच को-ऑपरेटिव्ह कोर्ट ,चॅरेटी कमिश्नर कोर्ट, कंझ्युमर कोर्ट, फॅमेली कोर्ट , इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट, ऍक्सीडेंट कोर्ट आदी कोर्टात चालणार्‍या खटल्यांवर महा अदालत मध्ये सुनावणी होणार आहे. नुकसान भरपाई बाबतचे अजून दाखल न झालेली प्रकरण जामिनीच्या वादा बाबतच्या तसंच विस्थापितांचे खटले महा अदालत मध्ये चालणार आहेत.यावेळी ज्या गुन्ह्यात मोठी शिक्षा होऊ शकते अशा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याबाबत महा अदालत मध्ये निकाल होणार नाही. या महाअदालत मध्ये एकदा का निकाल झाला की मग त्या विरोधात कोणत्याही बाजूच्या व्यक्तीस कुठे ही दाद मागता येणार नाही. तसेच न्याय करताना कुणावरही दबाव आणला जाणार नाही.ज्या कुणाला या न्याय अदालत मध्ये सहभागी व्हायचं आहे.त्यांनी त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाशी संपर्क साधावा असं आव्हान प्राधीकरणाचे अवर सचिव देवराव मोडेकर यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close