S M L

एक नजर दिवाळी अंकांवर

2 नोव्हेंबर, मुंबई - दिवाळी अंकांना 2008 सालात 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. या दिवाळी अंकांनी गेली 100 वर्षं विविध वाचकांना आनंद दिला आहे. तो आनंद नव्या पीढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काही दिवाळी अंकांची ओळख 'आयबीएन लोकमत'च्या फिचर्स एडिटर ज्ञानदांनी करून दिली. ज्याचं वाचनावर मनापासून प्रेम आहे आणि ज्याला मराठी उत्तम वाचायचं आहे त्याला 'ललित'चा दिवाळीअंक वाचल्याशिवाय राहवणारच नाही. यातला ज्येष्ठ पत्रकार लेखक हेमंत देसाईंचा 'किताबें कुछ कहना चाहती हैं...' हा लेख अत्यंत वाचनीय झाला आहे. या लेखामुळे नव्या पीढीने काय वाचलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं वाचलं पाहिजे याचं आणि नवीन काय वाचलं पाहिजे याचं भान येतं. याचबरोबर अनेक चांगले दर्जेदार लेख या दिवाळी अंकात आहेत. विलास खोले यांचा वि.दा. करंदीकरांवरचा 'सफल साहित्यिक जीवनयात्रिक वि.दा. करन्दीकर' हा लेख, वा.रा.ढवळेंच्या स्मृतींना अर्पण झालेला 'कर्ते साहित्यिक वा.रा.ढवळे' सुधा जोशींनी लिहिलेला लेख अतिशय संुदर आहेत. ललितच्या या अंकामध्ये नवीन लेखकांची आणि येणा-या प्रकाशकांचीही ओळख होत जाते. 'साप्ताहिक सकाळ'च्या 2008च्या दिवाळी अंकांत उत्तम लेख चांगल्या चांगल्या लेखकांनी एकत्र येऊन लिहिले आहेत. पण या सर्वलेखांना जोडणारी सुसंगत संपादकीय भूमिका ‘सप्ताहिक सकाळ’मध्ये काही दिसत नाहीये. अच्युत गोडबोलेंचा 'माझी शोधयात्रा' हा लेख, अनिल अवचटांचा मॉरिशियसच्या प्रवासाविषयीचा लेख वाचणा-याला विशेष भावतात. तर 'साप्ताहिक सकाळ'मधला विशेष उल्लेखनीय लेख आहे तो धनंजय कुलकणीर्ंचा. त्यांनी तेलंगणच्या तिढ्यावर विशेष उल्लेखनीय लिहिलं आहे. 'आयबीएन लोकमत'च्या फिचर्स एडिटर ज्ञानदा यांनी 'ललित'आणि 'साप्ताहिक सकाळ'चं जे समीक्षण वजा विश्लेषण केलं आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती अशी की दोन्ही दिवाळी अंक वाचनीय आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 03:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 03:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close