S M L

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून आघाडीत बिघाडी !

12 जानेवारीमहागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरू झाली. आघाडीचं सरकार असल्यामुळेच महागाईला आळा घालण्यासारख्या मुद्द्यांवर सरकारला मर्यादा येतात असं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल यांचं हे वक्तव्य उर्मटपणाचे आणि लोकशाहीविरोधी असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने यावर सारवासारव केली. वाढत्या महागाईच्या निमीत्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आघाडी सरकारच्या मर्यादांमुळे आम्हाला वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण जमत नाही असं राहुल गांधी लखनौमध्ये बोलले आणि वादाची टिणगी पडली. या टीकेनंतर लगेच काँग्रेसनही प्रतिक्रिया दिली. महागाई कमी करण्यासाठी काँग्रेसही प्रयत्न करत असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं. तसेच राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. हे सांगायलाही काँग्रेस विसरलं नाही. आणि यानंतर लगेचं राष्ट्रवादीनं, राहुल गांधींना क्लिनचीट दिली.वाढत्या महागाईवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पहिल्यांदाचं वाद झाला नाही. या अगोदरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्यात. आघाडी सरकार असल्यामुळे,जबाबदारी सगळ्यांची आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. नेमकं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत असतांना यूपीएमध्ये असा वाद होण हे दुदैर्वचं म्हणाव लागेलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 12, 2011 07:27 PM IST

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून आघाडीत बिघाडी !

12 जानेवारी

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरू झाली. आघाडीचं सरकार असल्यामुळेच महागाईला आळा घालण्यासारख्या मुद्द्यांवर सरकारला मर्यादा येतात असं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल यांचं हे वक्तव्य उर्मटपणाचे आणि लोकशाहीविरोधी असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने यावर सारवासारव केली.

वाढत्या महागाईच्या निमीत्तानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आघाडी सरकारच्या मर्यादांमुळे आम्हाला वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण जमत नाही असं राहुल गांधी लखनौमध्ये बोलले आणि वादाची टिणगी पडली. या टीकेनंतर लगेच काँग्रेसनही प्रतिक्रिया दिली. महागाई कमी करण्यासाठी काँग्रेसही प्रयत्न करत असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं. तसेच राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. हे सांगायलाही काँग्रेस विसरलं नाही. आणि यानंतर लगेचं राष्ट्रवादीनं, राहुल गांधींना क्लिनचीट दिली.

वाढत्या महागाईवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पहिल्यांदाचं वाद झाला नाही. या अगोदरही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्यात. आघाडी सरकार असल्यामुळे,जबाबदारी सगळ्यांची आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. नेमकं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत असतांना यूपीएमध्ये असा वाद होण हे दुदैर्वचं म्हणाव लागेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 12, 2011 07:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close